ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकारामांच्या साहित्यातील पाच हजारांहून अधिक सुभाषितांचे संकलन ‘अतिथी’ या विषयावर संत ज्ञानेश्वर यांचे ‘जैसा अपमानिता अतिथी ने सुकृतीची संपत्ती’ हे तर संते एकनाथ यांचे ‘अतिथी जाता परान्मुख त्या सवे जाय पुण्य निक्षेप’ अशी सुभाषिते आहेत. तर ‘आरोग्य’ या विषयावर संत ज्ञानेश्वरांची ३७ सुभाषिते आहेत. याच विषयावर नामदेव-४, एकनाथ-८ रामदास स्वामी-१ आणि तुकाराम यांची ११ सुभाषिते या कोशात देण्यात आली आहेत...
सुभाषिते ही संस्कृत भाषेतीलच असतात, हा समज दूर करण्याचा प्रयत्न अठय़ाहत्तर वर्षांच्या रामभाऊ नगरकर यांनी केला आहे. अथक परिश्रम आणि अभ्यासातून नगरकर यांनी संकलित केलेला ‘संत सुभाषित कोश’तयार झाला आहे. या कोशात संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास स्वामी आणि तुकाराम या पाच संतांच्या साहित्यातील ५ हजार १४७ सुभाषिते एकत्रित देण्यात आली आहेत.
हा कोश पाचशे पानांचा असून तो मासिकाच्या आकारात आहे. गेली वीस वर्षे नगरकर या कोशावर काम करत होते. या पाच संतांचे सर्व साहित्य वाचून, त्यावर अभ्यास करून सुभाषिताचे निकष ज्याला चपखल बसतील, अशा ओळी त्यांनी अक्षरश: वेचून काढल्या आहेत. हा कोश पुण्याच्या डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केला असून येत्या २८ ऑगस्ट रोजी पुण्यात संत साहित्याचे अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अद्यासनाचे डॉ. यशवंत पाठक यांच्या हस्ते या कोशाचे प्रकाशन होणार आहे. या कोशाबाबत ‘वृत्तान्त’ला माहिती देताना नगरकर यांनी सांगितले की, या कोशात सुभाषित म्हणजे काय, ते ठरविण्याचे निकष कोणते, सुभाषिते मराठीत असू शकतात का, म्हणी आणि सुभाषिते यातील फरक, संस्कृत सुभाषिते असलेले विविध ग्रंथ, त्यांचा धावता आढावाही आपण घेतला आहे. सुभाषिते ही फक्त संस्कृत भाषेतच असतात, हा गैरसमज आपण या कोशाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुभाषितांची निवड करताना या कोशात त्याचे विषयवार वर्गीकरण करण्यात आले असून ११५ विषय घेण्यात आले आहेत. अतिथी, अभ्यास, आाकाश, आरोग्य, आरसा, गंध, गुरू, ग्रंथ, भक्ती, भीती, मद्य, मासा, मुक्ती, मोक्ष आणि अनेक विषयांवरील मराठी सुभाषिते या कोशात असल्याचे सांगून नगरकर म्हणाले की, कोशात परिशिष्ट देण्यात आले असून या प्रत्येक संतांचे सुभाषित कोठून घेतले त्याचा मूळ संदर्भ देण्यात आला आहे.
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई आणि ठाणे वृत्तान्तमध्ये १७ ऑगस्ट २०११ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे. मुंबई वृत्तान्तमधील बातमीची लिंक अशी
http://epaper.loksatta.com/9978/indian-express/17-08-2011#p=page:n=19:z=1

No comments:
Post a Comment