या पुस्तकाच्या पुस्तकात नांदीचा पहिला सूर यात लेखकांनी म्हटले आहे की, कालप्रवाह हा वाहात असतो. त्या ओघात जुन्या गोष्टी वाहून जातात. त्यांची जागा नव्या वस्तूंनी घेतली जाते.
अंगरखा, रुमाल, उपरणे, नऊवारी
लुगडी हे सारे कालबाह्य होते पानाची चंची
आणि सफारी सूट, सलवार कमीज हे दिसू लागते. भरघोस अंबाडा नाहीसा होतो आणि त्याची जागा बॉबकट व
बॉयकट घेतात. नव्या पिढीला या स्थित्यंतराची काहीच
पाणी साठविण्याचे घंगाळे
कल्पना नसते. आजच्या युगातल्या बार्बी बाहुलीशी खेळणाऱया मुलीला, आपली आजी लाकडाची ठकी ही बाहुली घेऊन खेळत असे, हे कळले की ती टखी होती तरी कशी, हे जाणून घेण्याची अनावर इच्छा होते. तशीच ती ठकी पाहून आजीच्याही दृष्टीसमोर तिचे सारे बालपण साक्षात उभे राहते. आणि म्हणूनच प्रौढांना आपले बालपण पुन्हा आठवावे आणि बालांना आपले आई-वडील कसे राहात असावेत हे नव्याने समजावे त्यासाठी अशा जुन्या हरवलेल्या काही वस्तूंची ओळख या पुस्तकात आहे.
सोवनी यांनी हरवले ते या पुस्तकात अशा विस्मृतीत गेलेल्या सुमारे एकशे एक वस्तूंची सचित्र ओळख करुन दिली आहे. हे पुस्तक पुण्याच्या श्रीराम रानडे व सौ. सजीवन रानडे यांच्या भारद्वाज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. दोन वर्षांपूर्वी ( १ मे २००७) या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची सचित्र माहिती वाचतांना आपल्यालाही थक्क व्हायला होते आणि या वस्तूंचा त्या काळात लोक वापर करत होते, ते वाचून गंमत वाटते. यात काही वस्तू अनवधनाने राहूनही गेल्या आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची आणि वापरात असलेली वस्तू म्हणजे पाणी तापविण्याचा बंब. आजच्या गिझर आणि हिटर व सोलर उर्जेवरील पाणी तापवण्याच्या काळात बंब हे नाहीसे झाले आहेत. मात्र अशा काही वस्तू सोडल्या तर सोवनी यांनी जुन्या काळातील अनेक वस्तूची आपल्याला या पुस्तकात ओळख करुन दिली आहे.
अधोली या वस्तूपासून सुरु झालेला हा प्रवास हंडी पर्यंत येऊन थाबतो. हे पुस्तक वाचताना आपण जणू काही त्या जुन्या काळात सहजपणे एक फेरफटका मारून येतो. १९५७ मध्ये नवीन वजने-मापे प्रचारात आली. पूर्वीची शेर, पायली, पल्ला मण ही मापे जाऊन ग्रॅम, किलो यांचा वापर सुरु झाला. पूर्वीची मापे ही बारीक आणि दोन्ही बाजूंना खाली व वर पसरत जाणाऱया वर्तुळाकाराच्या आकाराची असत. त्यापैकीच अधोली हे एक माप होते. उखळी आणि मुसळ ही अशीच काळाच्या पडद्याआड गेलेली वस्तू. उखळी म्हणजे दोन ते अडीच फूट उंचीची लाकडी किंवा दगडाची डमरुच्या आकाराची आणि आत पूर्ण पोकळी असलेली वस्तू. तर मुसळ म्हणजे पाच ते सहा फूट उचीचा आणि तीन ते चार इंच व्यासाचा एक साकडी दंडगोल दांडा. यात शेतातून आलेले धान्य घालून वरुन घाव घातले जायचे. त्यामुळे धान्याला चिकटलेली साले, टरफले, भूसा वेगळा होऊन धान्याचे दाणे मोकळे होत असे.
लहान बाळाच्या टोपीचा एक पारंपरिक प्रकार असलेली कुंची. पायात घालण्याच्या लाकडी खडावा, दाणे किंवा अन्य पदार्थ कुटून त्याची बारीक पूड करण्यासाठी वापरण्यात येणारा खलबत्ता, कपडे अडकवायची खुंटी, विहिरीत पडलेली भांडी, बादली काढण्याचा गळ, गंगेचे पाणी असणारा गडू, गंजिफा हा सोंगट्यांचा खेळ, गंध लावण्याची साखळी, घटिकापात्र, ताक करण्याचा घुसळखांब, पाणी साठवण्याचे घंगाळ, चरखा, पाळण्याला टांगले जाणारे चिमणाळे, चिलिम, अंगणातील माती नीट बसविण्यासाठी असलेले चोपणे, पान, सुपारी, कात आणि
तंबाकू ठेवण्याची चंची, धान्य दळण्याचे जाते, झारी, टकळी
धान्य कांडण्याचे उखळ
आणि पेळू, कपडे ठेवण्याची लोखंडी ट्रंक, डिंकदाणी, पाणी साठविण्याची डोणी, ढब्बू पैसा, दिंडी दरवाजा, कापूस पिंजण्याची पिंजण धनुकली, केस कापणारा नाभिक वापरायची ती धोपटी, पाणी वाहून नेण्याची पखाल, पगडी, पाटा-वरवंटा, पानाचा डबा, लहान मूल उभे राहू लागले की त्याला देण्यात येणारा पांगुळगाडा, प्रवासात पाणी पिण्यासाठी वापरला जाणारा फिरकीचा तांब्या, भिकबाळी, पोहण्याचा भोपळा, वाळूचे घड्याळ, रॉकेलचा पंप, रोवळी, रांगोळी काढण्याचे रांगोळे, शिंके, धान्य पाखढण्याचे सूप अशा वस्तूंची माहिती यात देण्यात आली आहे.
आजच्या पिढीसाठी माहितीचा नवा खजिना तर जुन्या पिढीतील लोकांसाठी स्मृतिरंजन असे हे पुस्तक आहे.लेखक म. वि. सोवनी यांचा संपर्क
९, अनामय अपार्टमेंट, २३, आयडियल कॉलनी, पौंड रस्ता, कोथरुड, पुणे-४११०३८
भारद्वाज प्रकाशन संपर्क
उमेश, १२८/२ सुमार्ग गृहरचना, नवकेतन, गल्ली क्रमांक-५, कोथरुड, पुणे-४११०३८
दूरध्वनी (०२०-२५४४८०३८)
देऊळ, जुने वाडे यात दिवे लावले जायचे
त्या हंड्या (हंडी)
No comments:
Post a Comment