पुणे येथे येत्या मार्च महिन्यात होणाऱया ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्ञानपीठ पुरस्कारविजेते मराठीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या हस्ते होणार आहे. लोकसत्ताच्या प्रतिनिधी म्हणून मला या निमित्ताने विंदांची भेट घेऊन त्यांच्याशी गप्पा करता आल्या. विंदांचे वय आज ९२ वर्षे आहे, वयोपरत्वे आता मला जास्त वेळ बोलणे आणि बसणे शक्य होत नाही. त्यामुळे पाच ते दहा मिनिटेच मी बोलू शकेन. चालेल ना. मराठी साहित्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर पाच ते दहा मिनिटे का होईना आपल्याला बोलायला मिळते आहे, हा एक चांगला योग होता. मी त्यांना हो म्हटले आणि बुधवारी सकाळी विंदांच्या घरी ही भेट ठरली.
विंदांशी वांद्रे येथील साहित्य सहवासमधील त्यांच्या निवासस्थानी मी बरोबर साडेअकरा वाजता पोहोचलो. घरी स्थानापन्न झाल्यानंतर पाढंराशुभ्र लेंगा व हाफ कु़डते अशा वेशात विंदा हॉलमध्ये प्रवेश करते झाले. गप्पांच्या सुरुवातीला साहित्य संमेलनाचे उद््घाटन तुमच्या सारख्या कवीच्या हस्ते होत आहे, ही चांगली सुरुवात असल्याचे सांगून मी बोलायला सुरुवात केली. त्यावर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी राजकारणी किंवा मंत्र्यांना बोलाविण्याची आजवरची परंपरा होती. माझ्यामुळे ती आता मोडली जाणार असल्याचे ते मिश्कीलपणे म्हणाले.
हा योग कसा जुळून आला, त्याबाबत विचारले असता विंदा म्हणाले की, संमेलन आयोजकांनी प्रत्यक्ष भेटून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितले की, उद्घाटन कार्यक्रमाला भाषण वगैरे करणार नाही. काव्यवाचन करेन आणि तेच संमेलनाचे उद्घाटन असेल. तुम्हाला चालेल का? संमेलन आयोजकांनीही त्यास मान्यता दिल्यामुळे मी या आमंत्रणाचा स्वीकार केला.
माझ्याच काही कवितांचे वाचन मी या वेळी करणार असून तो कार्यक्रम म्हणजेच साहित्य संमेलनाचा उद््घाटन सोहळा असेल. आता वयोपरत्वे काव्यवाचनाचे कार्यक्रम मी करत नाही. पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा एक मोठा सोहळा असतो. हजारो रसिक, वाचक आणि साहित्यप्रेमी तेथे उपस्थित असतात. हे साहित्य संमेलन आपल्या मराठी भाषेचे, वाङ्मयाचे असते. त्यामुळे मराठी भाषेसाठी कर्तव्य म्हणून या वयात मी संयोजकांचे हे आमंत्रण स्वीकारले, असेही विंदानी सांगितले.
पूर्वी मी अडीच ते तीन तास इतका वेळ काव्यवाचनाचे कार्यक्रम करत असे. आता वयोपरत्वे इतका वेळ बसणे, बोलणे शक्य होत नाही. तरी उद्घाटनाच्या कार्यक्रमात अर्धा ते पाऊतास मी काव्यवाचन करेन. कोणत्या कविता वाचायच्या, ते ठरवले आहे का, असे विचारले असता, विंदा म्हणाले की, असे काही ठरवलेले नाही. ज्या नेहमी वाचतो आणि सगळ्यांना माहितीच्या आहेत, त्या कविता सादर करेन.
गप्पांच्या ओघात आपण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्वेला असलेल्या सरखोतांच्या चाळीत राहात होतो. माझी पत्नी सुमा तेव्हा कल्याणला शाळेत नोकरी करत होती आणि मी नोकरीसाठी मुंबईला येत होतो. काही महिने आम्ही डोंबिवलीला राहिलो. त्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्तानेही मी डोंबिवलीला आलो होतो, अशा आठवणीनाही विंदानी या वेळी उजाळा दिला.
सध्या नवीन काही लिखाण करता का, या प्रश्नावर ते म्हणाले की, नाही हो, नवे लेखन करणे काही वर्षांपूर्वीच थांबवले. त्यामुळे सध्या नवीन कविता लेखन काही नाही. दिवाळी अंकातून माझ्या काही कविता येत असल्या तरी त्या जुन्याच असतात. खरे सांगू का ओढूनताणून अवसान आणायला मला पटत नाही. तो खोटेपणा वाटतो.
विंदांनी भेटण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचाच वेळ दिला होता. गप्पांच्या ओघात वेळ संपत आली तेव्हा त्यांनीच त्यांच्या परखड स्वभावानुसार त्याची जाणीव करुन दिली. वयोपरत्वे आता फार वेळ बोलता आणि बसता येत नाही, म्हणूनच वेळेची ही मर्यादा घालावी लागते असे सांगून मी आता थोडा वेळ विश्रांती घेतो असेही ते प्रांजळपणाने सांगून टाकतात. वयोपरत्वे ते थकले असले, आवाजही थोडा हळू झाला असला तरी त्यांचे विचार व मूल्यांतील ठामपणा आणि नवीन काही करण्याची जिद्द, गप्पा मारण्याचा उत्साह आजही कायम आहे. त्याची प्रचिती या गप्पांमधूनही येत होती.
गप्पांचा समारोप करताना विंदानी ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ ही आपली गाजलेली कविता त्याच उत्साहात आणि खणखणीत आवाजात म्हटली आणि मराठी साहित्यातील एका उत्तुंग व्यक्तिमत्वाशी झालेली ही छोटेखानी भेटही लाखमोलाची ठरली...
विंदाशी झालेल्या या गप्पांच्या आधारे मी केलेली बातमी लोकसत्ता, ७ जानेवारी २०१०च्या मुख्य अंकात पान क्रमांक चारवर प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीची लिंक अशी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=37830:2010-01-06-16-59-51&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
नमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.
08 January 2010
07 January 2010
पुरस्काराचा आनदं आणि समाधान वेगळेच
राज्य शासनातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱया लता मंगेशकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांची निवड झाली आहे. त्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला होता. ती बातमी लोकसत्ता (मुंबई) ७ जानेवारी २०१० च्या अंकात पान क्रमांक पाच वर प्रसिद्ध झाली आहे. आज ती बातमी मी येथे देत आहे.
‘लता मंगेशकर’ हे नाव पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वअसून या नावाची खरी ओळख त्यांचा सुमधुर आवाज ही आहे. ज्या सुमधुर आवाजासाठी हे नाव प्रसिद्ध आहे, त्या लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मला जाहीर झाला, त्याचा आनंद आणि समाधान काही वेगळेच असल्याची भावना सुमन कल्याणपूर यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आणि त्यांच्या चाहत्यांना मनापासून आनंद झाला. आपल्या गोड गळ्याने गेली अनेक वर्षे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या या गायिकेचा या पुरस्काराने योग्य सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटली.गेल्या काही वर्षांपासून पाश्र्वगायन आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर असलेल्या सुमन कल्याणपूर या निमित्ताने पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये आल्या.
पुरस्कारासाठी सुमन कल्याणपूर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज सकाळपासूनच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरचा दूरध्वनी सतत खणखणत होता. काहींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या सर्व गडबडीत सुमनताई आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे मी भावगीते, भक्तीगीते, चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केले आहे. रसिकांच्या उदंड प्रेमामुळे आणि देवीच्या आशीर्वादामुळे मी हे योगदान देऊ शकले. राज्य शासनाने माझ्या या योगदानाची दखल घेऊन लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड केली त्याचा आनंद होतोय. मनात आनंद आणि एक वेगळेच समाधान आहे..
काही महिन्यांपूर्वी सुमन कल्याणपूर यांच्या ‘सुमनसुगंध’ या आत्मचरित्राचे प्रकाशन रवींद्र नाटय़ मंदिर येथे झाले होते. नवचैतन्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्याचे शब्दांकन मंगला खाडिलकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमनताई बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर रसिकांसमोर आल्या होत्या. त्यावेळी भाषण न करता त्यांनी त्यांची गाजलेली काही मराठी आणि हिंदी गाणी गाऊन तर काही गुणगुणून उपस्थित रसिकांना एक वेगळाच आनंद दिला होता. या वयातही त्यांच्या गोड गळ्यातून उमटलेले स्वर रसिक आणि सुमनताईंच्या चाहत्यांना सुखावून गेले होते. त्यावेळी सुमनताई यांनी पुन्हा पाश्र्वगायनाकडे वळावे, अशी जाहीर विनंती त्यांना करण्यात आली होती.
तो संदर्भ घेऊन या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलताना त्यांना, पुन्हा पाश्र्वगायनाकडे वळण्याचा विचार आहे का, किंवा कोणाकडून तशी विचारणा झाली आहे का, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, रसिकांचा आग्रह हा शिराधार्थ आहे. रसिकांच्या प्रेमामुळेच मी आत्तापर्यंत जे काही गायले ते त्यांनी उचलून धरले. पण खरे सांगू का, आत्ता सध्या तरी पाश्र्वगायन करण्याचा कोणताही विचार नाही. पण मंत्र, स्तोत्रे, देवीच्या आरत्या अशा काही प्रासादिक रचना किंवा भक्तीगीते असलेल्या गाण्यांबद्दल विचारणा झाली तर मी त्यावर जरुर विचार करेन.
देवीवर माझी खूप श्रद्धा असून तिच्या कृपाआशीर्वादामुळेच मला हा आवाज मिळाला आहे. तो मी रसिकापर्यंत सुगम आणि चित्रपट संगीताच्या माध्यमातून पोहोचवला. देवीच्या कृपेमुळे पुन्हा अशी संधी चालून आली, मला पाश्र्वगायन करण्याची बुद्धी दिली तर कदाचित पुन्हा गाईनही, असेही कल्याणपूर यांनी सांगितले.‘सुमनसुगंध’ या आत्मचरित्राविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या पुस्तकाच्या निमित्ताने माझे जीवनचरित्र, माझ्याबद्दलची सविस्तर माहिती, छायाचित्रे लोकांपर्यंत पोहोचली. गेल्या काही वर्षांपासून मी पाश्र्वगायन आणि प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर असलल्याने माझ्याबद्दलही फारशी माहिती नव्हती. ती या पुस्तकामुळे सगळ्यांना कळली. पुस्तकात माझी गाणी, पुरस्कार यांची यादी देण्यात आली आहे. मात्र काही पुरस्कार व गाण्यांचा समावेश राहून गेला आहे. आता दुसऱ्या आवृत्तीत त्या माहितीचा समावेश करण्याचा प्रयत्न करु. पुस्तकाला रसिक, साहित्यप्रेमी आणि आपल्या चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिली आवृत्ती आता संपत आल्याचेही त्या म्हणाल्या. विविध दूरचित्रवाहिन्यांवर सध्या सुरु असलेले संगीताचे कार्यक्रम, स्पर्धात्मक शो याबद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आजच्या पिढीला अशा माध्यमातून लोकांपुढे येण्याची संधी मिळतेय ही चांगली गोष्ट आहे. मात्र या मुलांनी मिळालेल्या प्रसिद्धीबरोबरच वाहावत न जाता संगीताचा आणि आपला शालेय-महाविद्यालयीन अभ्यासही पुढे सुरु ठेवावा, असा सल्लाही सुमनताईंनी दिला.याच अनुषंगाने अन्य काही प्रश्न त्यांना विचारले असता, त्या विनयाने म्हणाल्या की, अहो ही तर मुलाखतच व्हायला लागली. सध्या आपण फक्त मिळालेल्या पुरस्कारावरील माझी प्रतिक्रिया एवढय़ापुरतेच बोलू या. उगाच मी काहीतरी बोलायचे आणि नाहक नवा वाद निर्माण व्हायचा. त्यापेक्षा पुन्हा बोलू या कधीतरी. एका वृत्तपत्रात आज प्रसिद्ध झालेल्या बातमीत सुमनताईंचे आडनाव आणि जन्मठिकाण चुकीचे छापून आले आहे. त्याबद्दलही त्या व्यथीत झाल्या होत्या. त्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. बोलण्याच्या शेवटी मिळालेल्या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा त्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले..

05 January 2010
मन करा रे प्रसन्न
मुंबई आणि डोंबिवलीतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी कोणाही सुजाण आणि संवेदनशील माणसाचे मन हळहळल्यावाचून राहणार नाही. सातवी, सहावी आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकणाऱया या मुलांनी आपले जीवन संपवले. परिक्षेत चार विषयात नापास झाला म्हणून एकाने, तर नृत्याचा क्लास बंद करुन अभ्यासाकडे लक्ष द्यावे, असे घरच्यांनी सांगितले म्हणून एका मुलीने आणि दोन विषयात नापास झाल्यामुळे एमबीबीएस करणाऱया एका तरुणीने आत्महत्या केली. अशा प्रकारच्या दुर्देवी घटना अधूनमधून आपल्या सभोवताली घडत असतात. आपण त्या वाचतो आणि सोडून देतो. साध्या आणि क्षुल्लक वाटणाऱया या घटनांमध्ये या मुलांनी आयुष्य संपविण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला हे कळत नाही.
परीक्षेतील किंवा प्रेमातील अपयश, नोकरीतील जाच, वरिष्ठांचा त्रास, मानहानी, अपेक्षित यश न मिळणे, नोकरीच नसणे, सततचे आजारपण, घरातील भांडणे आणि कटकटी, कुटुंबातील बेबनाव, सर्व क्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा, जीवनातील नैराश्य आदी आणि या सारख्या काही कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. याला केवळ त्या व्यक्ती जबाबदार आहेत की आजूबाजूचा समाज, बदलती जीवनशैली, सभोवतालचे वातावरण, प्रसारमाध्यमे, हिंदी चित्रपट, मालिका, परस्परातील हरवलेला संवाद, अधिकाधीक मिळविण्याचा हव्यास, कोणत्याही गोष्टीत समाधान नसणे आदीही घटक त्यास कारणीभूत आहेत. खऱेतर आपण सर्वानीच याचा गंभीरपणे विचार करण्याची आज वेळ आली आहे.
बहुतेक घरातून आई-वडील नोकरीसाठी बाहेर आणि घरात मुले एकेकटी असे चित्र दिसते. करिअर आणि नोकरी, पैसा यातून पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. घरातील सदस्यांमध्ये संवाद नाही. मित्र, चित्रपट, हिंदी मालिका, मौज, मजा आणि मस्ती असे एक चित्र हल्लीच्या मुलांमध्ये दिसून येत आहे. अर्थात याला काही अपवाद असतीलही. लाहनसहान कारणा वरुन चिडचिड करणे, मोठ्यांचे न ऐकणे, आपलेच म्हणणे खरे करणे, शिक्षण आणि करिअरच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाटेल ते करणे असेही काही जणांच्या बाबतीत घडते. कदाचित अशा काही घटनांमधून मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असेल. आपण अपेक्षित यश मिळवले नाही, अभ्यासात मागे राहिलो तर आई-वडील ओरडतील, ही भीती कदाचित मुलांच्या मनात असेल.
खरे म्हणजे आपण अजूनही जो मुलगा अभ्यासात हुशार तोच श्रेष्ठ, या मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाही. सध्याच्या जगात चांगली नोकरी मिळविण्यासाठी अभ्यास आणि किमान पदवी पर्यंतचे शिक्षण आणि त्यानंतर काही अभ्यासक्रम करणे आवश्यकच आहे. पण एखाद्या मुलाला अभ्यासात गती नसेल, त्याची आवड नसेल पण तो अन्य एखाद्या कलेत निष्णात असेल, त्यात तो अन्य अभ्यासू मुलांपैक्षा जास्त हुशार असेल, तर त्यात चुकीचे काय आहे. त्याला त्या विषयाच पुढे येऊ द्या. त्याच्यातील सुप्तकलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यात त्याला यशाचे शिखऱ गाठू द्या, बिघडले कोठे. पण तसे घडत नाही,. कधी कधी आई-वडिलांच्या इच्छेखातर मुलांना आवड आणि कुवत नसतानाही कॉमर्स, मेडिकल, किंवा इंजिनिअरिंगला पाठवले जाते. का, त्याला त्याचा आवडीचा विषय निवडू द्या ना. आपल्या इच्छा त्यांच्यावर आपण का लादतो.
खरे म्हणजे आपल्या मुलाचा नेमका कल आणि आवड लक्षात घेऊन त्याला त्याचा मार्ग निवडू द्यावा. परिक्षेतील यश म्हणजे सर्वस्व नाही किंवा तो जीवनमरणाचा प्रश्न नाही, परमेश्वराने दिलेला माणसाचा जन्म असा अविचाराने एका क्षणात वाया घालवू नका, कोणत्याही अपयशाने निराश न होता झाले ते झाले, अजून वेळ गेलेली नाही, पुन्हा प्रयत्न करु या, असे या मुलांवर बिंबवण्याची गरज आहे. बाहेरच्या जगात जे काही घडेल, त्यामुळे निराश आणि वैफल्यग्रस्त न होता पहिल्यांदा तुझ्या मनात जे काही आहे, ते आमच्याशी किंवा घरातील मोठ्या माणसांशी, बरोबरीच्या मित्रांशी मोकळेपणाने बोल, अशी शिकवण मुलांना द्यायला पाहिजे. पालकांनी तसा विश्वास आपल्या मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे. एखाद्यापाशी आपले मन मोकळे केले की मनावरचा ताण आणि दडपण, नैराश्य नाहीसे होते, याचे बाळकडून लहानपणापासूनच आपल्या मुलांना द्या.
यश हे सर्वस्व नाही. ते मिळाले तरी आनंद आणि नाही मिळाले तरी आनंद, जे मिळाले असेल त्यात समाधानी राहायला शिका. आपल्यापेक्षा वरती असलेल्या माणसाकडे पाहण्यापेक्षा जो माणूस आपल्यापेक्षा एक पायरी खाली आहे, त्याच्याकडे पाहा. जगण्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. प्रत्येक घराघरांमधून तसे वातावरण निर्माण होण्याची गरज आहे. तसे झाल तर अशा घटना टाळता येऊ शकतील. हे जीवन सुंदर आहे, ते क्षुल्लक कारणावरुन संपवू नका...

04 January 2010
नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा
आज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रमेवरील जी जी पुस्तके मिळाली ती मी वाचून काढली आहेत. बॅंकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर लिमये यांच्या मनात नर्मदा परिक्रमेचा विचार आला आणि तो त्यांनी जिद्दीने तडीसही नेला. लिमये हे पुण्याचे असून ते आणि त्यांच्या काही सहकाऱयांनी नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा पायीच फिरून पूर्ण करायची असा लिमये यांचा आग्रह होता. प्रवासात काही ना काही कारणाने एकेक करत त्यांचे सहकारी परिक्रमेतून अर्ध्यावरुनच परतले. फक्त लिमये यांची परिक्रमा जशी ठरवली होती तशी पायी पूर्ण झाली. परिक्रमेतील सर्व प्रवासाचे हे वर्णन अत्यंत प्रांजळ झाले आहे. लिखाणात कुठेही प्रौढी किंवा बडेजाव नाही. नर्मदा परिक्रमा या विषयाची आवड असणाऱयांनी हे पुस्तक जरुर वाचावे.
लिमये यांची ही परिक्रमा १४ डिसेंबर २००१ ते १५ एप्रिल २००२ अशा एकूण १२३ दिवसात पूर्ण झाली. नर्मदामाईच्या कृपेने तिने माझ्याकडून परिक्रमा करवून घेतली, असे लिमये प्रांजळपणे नमूद करतात. परिक्रमेच्या दरम्यान आलेले बिकट प्रसंग, त्यातून नर्मदामाईच्या कृपेने झालेली सुटका, परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात अश्वथ्थामाचे झालेले दर्शन, जागोजागी नर्मदामाता परिक्रमावासीयांची कशी काळजी घेत असते त्याचे आलेले अनुभव हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे. लिमये यांचे हे पुस्तक लिमये कुल विश्वस्त निधीने प्रकाशित केले आहे. निधीचे प्रमुख विश्वस्त वामन गणेश खासगीवाले यांचेही मनोगत पुस्तकाच्या प्रारंभी देण्यात आले आहे.
नर्मदा परिक्रमा म्हणजे आजच्या काळात भारतीय संस्कृतीची आदर्श मूल्ये जोपासणारा अमूल्य ठेवा आहे. तो हस्तगत करण्यासाठी फार काही नको. फक्त मनुष्य देह पुरेसा आहे. परमेश्वरी योजनेनुसार त्यात श्रद्धा आहेच. ती जपली की बळ प्राप्त होते आणि या दोन्हींच्या संयोगाने सुयश प्राप्ती खेरीज अन्य काही घडणेच संभवत नाही. थोडक्यात चांगला माणूस बनण्यासाठी मानवी जीवनाचा प्रवास नर्मदे हर कडून हर नर्मदे कडे व्हावा. नर्मदे हर म्हणजे नर्मदामाईस विनवणी की माझ्या दोषांचे निर्मूलन कर अर्थात सदगुणांचा अभ्युदय कर. आणि हर नर्मदे म्हणजे नर्मदामाईस अनन्यभावे शरण जाणे, या परते दुसरे भाग्य कोणी मागेल काय, असे लिमये यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.
पुस्तकातील नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा या लेखात लिमये यांनी आपल्या मनात ही परिक्रमा करण्याचा विचार कसा आला, त्याची तयारी कशी केली, घरच्यांची साथ कशी मिळाली, परिक्रमेहून परत आल्यानंतर पुस्तकाची तयारी कशी झाली, परिक्रमेदरम्यान लिमये यांनी दररोज दैनंदिनी लिहिण्याची सवय ठेवली होती. त्याचा फायदा या पुस्तकासाठी कसा झाला, पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी किर्लोस्कर मासिकात नर्मदा परिक्रमेविषयी प्रसिद्ध झालेली लेखमाला आदींचा सांगोपांग आढावा घेतला आहे. पुस्तकात लिमये यांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेचा मार्ग, नर्मदा मातेचे रंगीत छायाचित्र, परिक्रमेतील रंगीत छायाचित्रे, श्री नर्मदा यंत्र, नर्मदा देवीची आरती, नर्मदाष्टकम, नर्मदा नित्यपाठ तसेच नर्मदा परिक्रमेसाठी उपयुक्त अशी माहिती दिली आहे. एक उल्लेख आवर्जू केला पाहिजे. तो या पुस्तकात देखील आहे. नर्मदा परिक्रमेविषयी जगन्नाथ कुंटे लिखित नर्मदे हर या पुस्तकात जी काही छायाचित्रे देण्यात आली आहेत, ती लिमये यांनीच काढलेली आहेत.
एकंदरीत हे पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमेविषयीचा एक संदर्भ ग्रंथ झाला आहे. जिज्ञासू आणि नर्मदा परिक्रमा करणाऱयांना त्याचा नक्कीच उपयोग होईल.
लिमये यांचा संपर्क
०२०-२४४७३४८२
ई-मेल
sblimaye2000@yahoo.com किंवा sasuli@vsnl.com

03 January 2010
गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले
आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरंपरेतील एक नाव म्हणजे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराज हे रामाचे निस्सीम उपासक. त्यांनी सर्व समाजाला नामाची गोडी लावली. आजच्या काळात सर्वश्रेष्ठ असे जर काही असेल तर ते नाम आहे. प्रत्येकाने सतत नाम घेत राहावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. नुकताच गोंदवले येथे जाण्याचा योग आला आणि मी तेथे जाऊन आलो.
वसई येथे राहणारे माझे चुलत मेव्हणे अशोक ऊर्फ बापू अभ्यंकर हे गोंदवलेकर महाराज यांचे भक्त. त्यांचे गोंदवले येथे जाणे असतेच. मला कधीपासून गोंदवल्याला जायचे होते. तो योग नुकताच आला. अशोक अभ्यंकर हे गोंदवले येथे जाणार होते. त्यांनी मला विचारले आणि मी हो म्हटले. गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज यांचे समाधी मंदिर, मंदिराचा सर्व परिसर, गोशाळा, भव्य महाप्रसाद गृह आणि गोंदवले येथे येणाऱया भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाच्या इमारती आणि येथे निस्वार्थी वृत्तीने काम करणारे साधक सर्व काही विलक्षण आहे. प्रत्येकाने किमान एकदातरी गोंदवले येथे गेले पाहिजे. तुम्ही भाविक/श्रद्धाळू असाल तर भक्तीभाव म्हणून आणि तसे नसाल तर तेथे सुरु असलेले काम पाहण्यासाठी तरी तेथे भेट दिलीच पाहिजे.
गोंदवले येथील सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तेथील भक्त निवासात आपल्याला मुक्काम करायचा असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. खोली उपलब्ध असेल तर ती निशुल्क मिळते. तसेच दररोज दुपारी आणि रात्री महाप्रसाद असतो. एका वेळेस जेवणासाठी किमान पाच हजार भाविक (उत्सव किंवा गोंदवले येथे कोणताही विशेष कार्यक्रम नसताना) उपस्थित असतात. परंतु कुठेही गडबड, गोंधळ न होता सर्वांचे जेवण व्यवस्थित होते. महाप्रसादासाठी सर्वाना रांगेतून शिस्तीत आत सोडले जाते. जेवणात भात, गोड शिरा, कढी, ताक, एखादी रसभाजी. मसालेभात, मुगाची खिचडी असे पदार्थ असतात. दररोज हजारो माणसांचा स्वयंपाक येथे होत असतो. तसेच दररोज सकाळी व दुपारी सर्वाना चहा आणि सकाळी नाश्ताही कोणतेही शुल्क न घेता देण्यात येतो.
इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक, चहा आणि नाश्ता करण्यासाठी पहाटेपासूनच तयारी सुरु असते. प्रत्येकजण आपल्याला जमेल तशी येथे मदत करत असतो. काही मंडळी तर येथे मुद्दामहून सेवा म्हणून काम करण्यासाठी येत असतात. यातील अनेक जण सुशिक्षित, शहरात राहणारे आणि वेगवेगळ्या व्यवसायात काम करणारेही असतात. गोंदवलेकर महाराज यांच्यावरील श्रद्धेपोटी ही सर्व मंडळी आपले नाव आणि हुद्दा विसरुन येथे सेवा म्हणून काम करतात. दररोज दोन्ही वेळा हजारो माणसांचे जेवण, नाश्ता आणि चहा ही कामे बिनबोभाट होत असतात.
समाधी मंदिरातही पहाटेपासून काकडआरती, प्रवचन, किर्तन असे कार्यक्रम होत असतात. येथे आले आणि गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले की मन शांत होते. समाधी मंदिराचे आवार खूप मोठे आहे. मात्र स्रर्वत्र टापटीप आणि स्वच्छता असते. समाधी मंदिराचा गाभाराही स्वच्छ आहे. मंदिर परिसरातच संस्थेचे कार्यालय असून तेथे गोंदवलेकर महाराजांविषयी पुस्तके, छायाचित्रे. जपमाळ आणि अन्य साहित्य मिळते. अभिषेक, देणगीही .येथे स्वीकारली जाते. अन्य देवस्थानातील बडवे किंवा पुजाऱयांप्रमाणे गोंदवले येथील पुजारी किंवा अन्य कोणीही देणगी किंवा अन्य कामासाठी तुमच्या मागे लागत नाहीत. महाराजांच्या समाधी दर्शनासाठी इतकी दक्षिणा दिली तर अमूक रांग, तितके पैसे दिले तर तमूक रांग असाही प्रकार नाही. सर्वाना एकच न्याय. उगाचच गडबड, गोंधळही नसल्याने येथे मनाला खरोखरच शांत आणि प्रसन्न वाटते.
साध्या आणि सोप्या भाषेत, आपल्याच सभोवताली घडणारी उदहरणे देत गोंदवलेकर महाराज यांनी नाम आणि अध्यात्म खूप सोपे करुन सांगितले आहे. त्याचे चरित्र आणि त्यांनी केलेले रचना वाचल्यानंतर आपल्याही ते लक्षात येते. खरेच प्रत्येकाने किमान एकदा तरी गोंदवले येथे जाऊन हे सर्व काम प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभवावे.
समाधीमंदिर
02 January 2010
अप्रतिम शिल्पकलेची लेणी
अजिंठा लेणी येथे दगडात कोरलेली कमान
काही दिवसांपूर्वी सहकुटुंब औरंगाबादला गेलो होतो. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली अजिंठा आणि एलोरा (वेरुळ) लेणी पाहिली. दोन्ही लेणी पाहिली. ही लेणी पाहाताना आपण जगातील एक प्राचिन असा शिल्पकलेचा वारसा पाहात आहोत आणि तो भारतीय आहे, याचा रास्त अभिमान वाटला. ही लेणी म्हणजे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी याचे एकमात्र उदाहरण आहे. संपूर्ण लेणी म्हणजे अप्रतिम कलाकौशल्याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. खरे तर या दोन्ही लेण्यांचा समावेश जगातील सात आश्चर्यात केला गेला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोन्ही लेणी आणि केलेले कोरीव काम पाहिल्यानंतर न भविष्यती असेच म्हणावे लागते.
औरंगाबाद शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी असून बौद्ध वास्तुशास्त्र, भित्तिचित्रे आणि शिल्पकलेचा अजोड आणि अद्वितीय असा हा सर्व परिसर आहे. लेण्यांमधील भिंतींवर गौतम बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग चितारण्यात आले आहेत. आडव्या पसरलेल्या डोंगरात ही लेणी खोदण्यात आली असून येथे २९ लेणी आहेत. तर औरंगाबाद शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर एलोरा (वेरुळ) लेणी आहेत. वेरुळ येथील कैलास लेणे हे आधी कळस आणि मग पाया या प्रकाराने तयार करण्यात आले आहे. एका मोठ्या दगडात शिवमंदिर कोरण्यात आले आहे. ही लेणी दोन मजली असून वेरुळ येथे ३४ लेणी कोरली आहेत. अजिंठा आणि वेरुळ ही लेणी इसवीसन पाचव्या-सहाव्या शतकात कोरली गेली आहेत.
दोन्ही लेण्यांमधील कोरीव काम, भव्य मूर्ती, कोरण्यात आलेले विविध प्रसंग, बारीक प्रकारचे नक्षीकाम, चेहऱयांवरील हावभाव हे सर्व पाहून थक्क व्हायला होते. इतक्या वर्षांपूर्वी कोणतीही आधुनिक साधने नसताना तेव्हाच्या कलाकारांनी इतके प्रचंड आणि अद्वितीय असे हे काम कसे केले असेल, असा मनात विचार आला तरी थक्क व्हायला होते. मुळात असलेला डोंगर फोडून तेथे भव्य सभामंडप, गौतम बुद्धाच्या भव्य मूर्ती, अन्य देवदेवता, प्राणी, दगडात कोरणे हेच कठीण काम. किती लोक त्यासाठी राबले असतील, डोंगर कोरताना जमा झालेला निरुपयोगी माती व दगडांचा ढिगारा कसा वाहून नेला असेल, दिवसभर ही मंडळी कशी काम करत असतील, तेथेच की दुसरीकडे राहात असतील, असे अनेक प्रश्न मनात उमटतात. लेणी कोरणाऱया अनेक पिढ्या येथेच राहिल्या असतील. कारण अनेक वर्षे हे काम सुरु होते.
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही लेण्यांपैकी एकाही ठिकाणी किंवा लेण्यांच्या बाहेर हे काम कोणी केले,. त्या कलाकारांची नावे कोरलेली नाहीत. इतके प्रचंड आणि अद्वितीय काम कऱणाऱया या कलाकारांनी आपली ओळख कुठेही दिलेली नाही. सर्व कलावंत अज्ञातच राहिले आहेत. या दोन्ही ठिकाणी अनेक परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने भेट देत असतात. भारतीय शिल्पकलेचा हा अद्वितीय आणि नेत्रदिपक अविष्कार पाहिल्यानंतर ती मंडळीही थक्क होतात. अजिंठाच्या लेण्यांमधील काही गुहांमध्ये इतक्या वर्षांनंतरही रेखाटण्यात आलेल्या काही चित्रांचे रंग ताजे आणि जसेच्या तसे आहेत. अजिंठा येथील काही लेण्यांमध्ये प्रकाशाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे आतील सर्व चित्रे आणि दगडावर कोरलेले काम व्यवस्थीत पाहता येते. आजच्या काळातील मोठ्या नाट्यगृहात बसू शकतील एवढ्या आसनक्षमतेचे मोठमोठे हॉल आणि तेथे असलेले कोरीव दगडी खांब, कमानी, नक्षी पाहिली की मन थक्क होते.
खरोखरच अजिंठा आणि वेरुळ लेणी हे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य म्हणावे लागेल. खरे तर या दोन्ही लेण्यांचा समावेश जगातील सात आश्चर्यात झाला पाहिजे. ते स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत.

अजिंठा लेण्यांत छतावर केलेले पेंटिंग
खरोखरच अजिंठा आणि वेरुळ लेणी हे जगाच्या इतिहासातील एक आश्चर्य म्हणावे लागेल. खरे तर या दोन्ही लेण्यांचा समावेश जगातील सात आश्चर्यात झाला पाहिजे. ते स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत. 01 January 2010
थर्टी फर्स्टचा सोहळा की झिंग
नमस्कार, आज १ जानेवारी २०१०. इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा जोशीपुराण या माझ्या ब्लॉगवर नवे लेखन केले नव्हते. डिसेंबर महिन्यात सुट्टीवर असल्याने डोंबिवली बाहेर जाणे झाले होते. त्यामुळे लेखन केले गेले नाही. १८ डिसेंबरला मी शेवटचा लेख लिहिला होता. त्यानंतर काहीच लिहिणे झाले नाही.
गेल्या काही वर्षांपासून थर्टी फर्स्ट साजरी करण्याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. मला वाटते २१ ड़िसेंबरचे हे महत्व वाढविण्यात काही प्रमाणात प्रसार माध्यमेही कारणीभूत आहेत. नाहीतर आपल्या कुटुंबापुरता किंवा आपण राहतो त्या सोसायटीपुरता मर्यादित असणारा ३१ डिसेंबर आज जणू काही वर्षाच्या अखेरीचा महत्वाचा आणि साजरा केलाच पाहिजे, असा एक सण झाला आहे. सध्या सगळीकडे मार्केटिंग आणि शो बिझनेसचे महत्व वाढले आहे. जे असेल ते कॅश करायचे ही वृत्ती वाढत चालली असून त्यातूनच मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी थर्टी फर्स्टला एका वेगळ्या पातळीवर नेऊन टाकले आहे. थर्टी फर्स्ट म्हणजे एक सोहळा झाला आहे.
थर्टी फर्स्ट म्हणजे फक्त खाणे, दारु पिणे, नाचणे आणि धम्माल करणे असा अलिखित नियम झाला आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शन ही एकमेव वाहिनी असताना दरवर्षीचे तेच रटाळ कार्यक्रम पाहात आणि त्यांना नावे ठेवत घराघऱांमध्ये ३१ डिसेंबर साजरा केला जायचा. आता घरातील ३१ डिसेंबर हा रस्त्यावर आणि गल्लीत आला आहे. ३१ डिसेंबर साजरा करताना अनेक जण भानावर नसतात. गर्दीच्या ठिकाणी किंवा विविध चौपाट्या या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी उसळलेली असते. जणू काही त्या दिवसापुरते सर्व प्रश्न, काळज्या मिटलेल्या असतात, असे वातावरण असते. अर्थात याला काही अपवादही असतात. केवळ मौज-मजा न करता काही विधायक काम करुन थर्टी फर्स्ट साजरी करत असतात. अशा वेगळ्या प्रयत्नांचे आणि उपक्रमांचे नक्कीच कौतुक करायला पाहिजे.
थर्टी फर्स्ट साजरा करावा की करु नये यावर वाद-प्रतिवाद होऊ शकतो. प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात. थर्टी फर्स्टला उत्तर म्हणून काही मंडळींनी गुढीपा़व्याच्या पूर्वसंध्येला (हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र पाडवा) असे सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. थर्टी फर्स्ट हा सोहळा म्हणजे नुसते फॅड असून केवळ प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेल्या भूलभूलय्यामुळे त्याचे महत्व अतोनात वाढले आहे असे मला वाटते. थर्टी फर्स्टच्या रात्री जे काही घडते त्याचे वृत्तान्तही दुसऱया दिवशी वृत्तपत्रातून येत असतात आणि ते आपल्यासाठी काही भूषणावह नसतात. अर्थात थर्टी फर्स्ट साजऱया होणाऱया सर्वच ठिकाणी असे काही घडते असे नाही. कदाचित घडत असले तरी सगळ्याच घटनांना प्रसिद्धी मिळत नसेल.
असो. आपल्याकडे आता सगळे सण आणि समारंभांचे इव्हेंट झाले आहेत. गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाचेच पाहा ना. सगळ्यात उंच हंडी लावून आणि भरमसाठ बक्षिसे ठेवून दरवर्षी दहीहंडी उंचच उंच बांधली जात आहे.दहीहंडी फोडताना काही युवक, मुले जखणी होत आहेत तर काही मृत्यूमुखी पडत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव यांचेही तसेच झाले आहे. सणांच्या नावाखाली त्यांचे झालेले व्यापारीकरण आणि त्यात होणारे गैरप्रकार याकडे सोयीस्कर डोळेझाक केली जाते. या सणांप्रमाणेच थर्टी फर्स्टचे झाले आहे. आपण त्यात किती वाहावत जायचे हे प्रत्येकाने स्वताशी ठरवावे.

Subscribe to:
Posts (Atom)