09 December 2009

रुद्राध्याय आता मायबोलीत

श्री रुद्र हे प्रमुख देव असून रुद्राध्यायाचे पठण सर्व वेदांमध्ये प्रचलित हे. भगवान शिव किंवा त्यांच्या अवतार स्वरुपाच्या कोणत्याही पूजेत श्री रुद्र म्हणून अभिषेक केला जातो. रुद्र हे यजुर्वेदातील मंत्र असून वाजसनेयी संहितेतील (अध्याय १६ व १८)  तैत्तरीय संहितेतील (४.५ मधील ११ अनुवाक व ४.७ मधील ११ अनुवाक) यातून ते संकलित केले आहेत. ते सर्व रुद्राध्याय म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषेत असलेला हा रुद्राध्याय आता मायबोली मराठी भाषेत जिज्ञासू आणि अभ्यासकांसाठी प्रभाकर गोखले यांनी उपलब्ध करुन दिला आहे.



गोखले यांनी रुद्राध्यायाचे केवळ मराठी भाषांतर केलेले नाही तर ते संगीतमय पद्यांतर आहे. यात महामृत्यूंजय मंत्र, शिवस्तुती आणि मंत्र पुष्पांजलीचे मराठी भाषांतरही देण्यात आले आहे. वृंदावनी सारंग रागात हे मराठी पद्यांतर बांधण्यात आले आहे. श्री रुद्र हे तीन भागात आहेत.  पहिल्या भागात शांतीपाठ असून दुसऱया भागात श्री रुद्राच्या सर्व स्वरुपाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यास नमक असे म्हटले जाते. तर तिसऱया भागात मानवाने आपल्यासाठी सर्व सुखाची मागणी केलेली असल्याने त्याला चमक असे म्हणतात. श्री रुद्राचे पठण करत असताना पहिल्यांदा शांतीपाठ, नंतर नमकचे ११ अनुवाक, महामृत्यूंजय मंत्र  आणि  शेवटी चमक ११ अनुवाक आणि शेवटी पुन्हा शांतीपाठ म्हणण्याची पद्धत आहे.


रुद्राध्याय हा संस्कृतमधील असल्याने अनेक जणांना त्याचे पठण करण्याची इच्छा असूनही तो करता येत नाही. त्यासाठीच गोखले यांनी हे मराठी रुपांतर केले आहे. डाव्या पानावर मूळ संस्कृत रुद्राध्यायचे अनुवाक आणि उजवीकडे प्रत्येक अनुवाकचे मराठी रुपांतर देण्यात आले आहे. गोखले यांनी रुद्राध्यायाच्या मराठी रुपांतराबरोबरच श्री गणपती अथर्वशीर्ष, श्री श्रीसूक्त, श्री पुरुषसुक्त, श्री रुद्राभिषेक माहात्म्य, श्री महिम्न स्तोत्र, श्री देवी अथर्वशीर्ष, ललिता पंचक, भवान्याष्टक, कनकधारा स्तोत्र,  अन्नपूर्णा स्तोत्र, देवी आराधाना, श्रीमद्भभगवतगीता अध्याय १२ व १५, उपनिषद शांतीपाठ, त्रिसुपर्ण, संकल्प, विष्णूध्यान, गंगालहरी-स्वल्प, सत्यनारायण कथा आदींचेही मराठी रुपांतर केले आहे. विशेष म्हणजे या सर्व स्तोत्रांचे मराठी रुपांतर करताना ती वेगवेगळ्या रागात गाता येतील, अशा प्रकारे त्यांची रचना करण्यात आली आहे.


गोखले यांनी संस्कृत स्तोत्रे मराठीत आणून खूप मोठे काम केले आहे. गोखले हे मुळचे वाराणसीचे. त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. पुढे काशी हिंदू विद्यापीठात त्यांनी स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली. तर पुढे अनेक वर्षे विद्यापीठाच्या कुलगुरुंचे सचिव म्हणून काम पाहिले व त्याच पदावरून निवृत्त झाले. अनेक जणांना संस्कृतमधील ही स्तोत्रे म्हणायची असतात, पाठ करायची असतात, पण योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा म्हणायला कठीण गेल्यामुळे ते म्हणणे अर्धवट सोडून देतात. हीच अडचण लक्षात घेऊन गोखले यांनी हे काम केले आहे.


गोखले यांचा संपर्क भ्रमणध्वनी आणि ईमेल आयडी पुढीलप्रमाणे

०९८२४३३८९४३

gokhalepg@yahoo.co.in


 
      

8 comments:

  1. where can i get this marathi rudra on net,...sugest site name

    ReplyDelete
    Replies
    1. This is available at Sulabh Prakashan, Parel, Mumbai-44012. Its photocopy can be sent by email. You may contact on mobile no. 918878886505 or by email gokhalepg73@gmail.com

      Delete
  2. उत्क्रुष्ट कार्य। मला हे कोठे उपलब्ध होऊ शकेल?

    ReplyDelete
    Replies
    1. ह्या बुकगंगाच्या लिंकवर - मराठी ओवीरूप रुद्राध्याय आहे
      ( शांती मंत्र चमक - नमक सहित )
      छान ओवीबद्ध भाषांतर केले आहे - लेखक दिवाकर अनंत घैसास
      प्रकाशक - केशव भिकाजी ढवळे , किंमत - १२ रुपये
      Address: 26, Shree Samarth Sadan,1st Bhat wadi, Girgaum,, Mumbai, Maharashtra 400004,Phone : 022-2385 4853
      http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5242977154742721476?BookName=Ovirup-Rudradhyay
      http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5242977154742721476&PreviewType=books

      Delete
  3. उत्क्रुष्ट कार्य। मला हे कोठे उपलब्ध होऊ शकेल?

    ReplyDelete
  4. ह्या बुकगंगाच्या लिंकवर - मराठी ओवीरूप रुद्राध्याय आहे
    ( शांती मंत्र चमक - नमक सहित )
    छान ओवीबद्ध भाषांतर केले आहे - लेखक दिवाकर अनंत घैसास
    प्रकाशक - केशव भिकाजी ढवळे , किंमत - १२ रुपये
    Address: 26, Shree Samarth Sadan,1st Bhat wadi, Girgaum,, Mumbai, Maharashtra 400004,Phone : 022-2385 4853
    http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5242977154742721476?BookName=Ovirup-Rudradhyay
    http://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=5242977154742721476&PreviewType=books

    ReplyDelete