मराठी उद्योजक मनोज तिरोडकर यांच्या जीटीएल इन्फ्रा कंपनीने एअरसेल सेल्युलर कंपनीकडून देशातील त्यांचे सर्वच्या सर्व १७ हजार ५०० मोबाइल टॉवर्स खरेदी करण्याचा करार आता इतिहास झाला. तिरोडकर यांच्या कंपनीने आता अनिल अंबानी समूहातील 'रिलायन्स इन्फ्रा'कडील ७५ हजार टॉवरचे ग्राहक मिळवून एक नवा विक्रम केला आहे. मराठी उद्योजकाच्या या गगनभरारीमुळे त्यांना मनोज ऊर्फ विक्रम तिरोडकर असे म्हणणे अधिक समर्पक ठरेल.
अंबानी यांच्याबरोबर केलेल्या करारामुळे 'जीटीएल इन्फ्रा'कडील ग्राहकांची संख्या आता सव्वा लाखाच्या घरात जाणार आहे. व्होडाफोन, रिलायन्स, एअरसेल, आयडिया, , भारती एअरटेल, युनॉर, टाटा टेलि सव्हिर्सेस, व्हिडिओकॉन आणि अन्य काही टेलिकंपन्यांचा समावेश आहे.
तिरोडकर यांनी मोबाइल कंपन्यांसाठी आवश्यक असलेल्या टॉवर्समध्ये मक्तेदारी मिळविली आहे. टूजी सेवा पुरविणाऱ्या १४ कंपन्या आणि थ्रीजी सेवा पुरविणाऱ्या नऊ कंपन्या तसेच ब्रॉड बँड वायरलेस (बीडब्ल्यूए)ची सेवा पुरविणाऱ्या आठ कंपन्या अशा या सर्व कंपन्यांना जीटीएलच्या टॉवर्सचा वापर केल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही.
आज ग्लोबल समूहात आठ कंपन्या आहेत, त्यापैकी दोन शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय ४६ देशांत चालतो. २२ देशांत स्वत:च्या कंपनीचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे. आज ग्लोबल समूहात आठ कंपन्या आहेत, त्यापैकी दोन शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या आहेत. त्यांचा व्यवसाय ४६ देशांत चालतो. २२ देशांत स्वत:च्या कंपनीचे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या ३५ हजारांवर गेली आहे.
तिरोडकर यांच्या या विक्रमाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांकडूनही घेण्यात आली आहे. फोर्ब्सच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 'र्वल्ड कॉम समूहा'ने त्यांना 'र्वल्ड यंग बिझनेस अचिव्हर अवॉर्ड' देऊन त्यांचा गौरव केला असून कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय)नेही त्यांना 'यंग आंत्रप्रीनर्स ट्रॉफी' प्रदान केली आहे.
उद्योग व्यवसायात मराठी माणूस यश मिळवू शकत नाही, त्याने केवळ दुसऱयांची चाकरीच करावी, असे मराठी माणसांबद्दल उपहासाने म्हटले जायचे आणि जातेही. पण आता हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. किर्लोस्कर, दांडेकर (कॅम्लीन), बेडेकर, पाठारे (व्हीआय़पी), अत्तरवाले केळकर, पेंढरकर (विको टुथुपेस्ट). चितळे (बाकरवडी, श्रीखंड) आणि अन्य काही असतील (मला पटकन जेवढी नावे आठवली तेवढी लिहिली) त्या मंडळींच्या य़ादीत आता मनोज तिरोडकर यांचे नाव कोरले गेले आहे. समस्त मराठी माणसांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
No comments:
Post a Comment