10 March 2012

राज्य कोणाचे मोंगलांचे की...

पुणे जिल्ह्यातील भेलकेनगर येथे शिवजयंतीच्या निमित्ताने लावण्यात आलेले एका चित्र काही जणांच्या भावना दुखावतात म्हणून काढून टाकण्याचे आदेश पोलिसांनी स्थानिक हिंदू युवकांना दिले. शाहिस्तेखान हा पुण्यातील लाल महालातून पळून जात असताना शिवाजी महाराज यांनी तलवारीने त्याच्या एका हाताची बोटे कापली असे ते चित्र होते. हे चित्र लावू नये असे पोलिसांनी सांगितल्याने महाराष्टा्रात राज्य मोंगलांचे आहे का असा प्रश्न समोर आला आहे.

हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. यापूर्वीही भारतात-महाराष्ट्रात राहणाऱया पण  पाकिस्तानाशी इमान राखणाऱया देशद्रोही आणि धर्मांध मुसलमानांसाठी कॉंग्रेस आघाडीने वेळोवेळी असेच लांगुनचालन केले आहे. दोन्ही कॉंग्रेसमधील मराठा नेते धर्मांध मुसलमानांचे लांगुनचालन आणि ब्राह्मण द्वेषाचेच राजकारण करत आहेत, असे दिसून येत आहे.

 महाराष्ट्रातील पळपुट्या आणि मुस्लिमांचे लांगूनचालन करणाऱया कॉंग्रेस आघाडी शासनाने (ज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही येतात) इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून अफजल खान वधाचे छायाचित्र काढून टाकण्याचा महापराक्रम केला होता. शिवजयंती किंवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्या काही मंडळांनी अफजलखान वधाचा देखावा तयार करून सजावटीमध्ये दाखवला होता, तो त्यांना काढायला लावण्याचे श्रेयही दोन्ही कॉंग्रेसच्या मराठा नेत्यांकडेच जाते. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची सर्वात्मका सर्वेश्वरा ही कविताही मुसलमानांच्या भावना दुखावतात म्हणून म्हणायची नाही, असा फतवा काढला होता.

राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील हे नुसते बोलका बाहुला आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील एक घटनाही हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारी होती. लाल महालात असलेले एक शिल्प रातोरात उखडून हलविण्यात आले. कारण या शिल्पात दादोजी कोंडदेव हे होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आपण मराठा असल्याबद्दल अभिमान बाळगतात. फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे उठसुट नाव घेतात. तुम्हाला मुसलमानांचे लांगुनचालन आणि ब्राह्मणांचा द्वेष करून खरा इतिहास पुसून टाकायचा असेल तर आपण शिवाजी महाराज यांच्या वंशातील आहोत, शिवाजी महाराज हे आमच्या मराठा ज्ञातीतील आहेत, असा खोटा आणि तोंडदेखला अभिमान तरी का बाळगता.

शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील सर्वात जास्त संख्या ब्राह्मणांची होती. शिवाजी महाराज यांनी अनेकांना अनेक प्रकारचे दान दिले, पण फक्त समर्थ  रामदास स्वामी यांनाच सज्जनगड हा किल्ला भेट म्हणून दिला. समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराज यांना मार्गदर्शन केले असा इतिहास आहे, तर तो का नाकारता, केवळ रामदास स्वामी हे ब्राह्मण होते म्हणून. काही ब्राह्मणद्वेष्ट्या मराठा संघटना तसे म्हणतात म्हणून की तुम्हालाही ते मान्य आहे, फक्त उघड बोलण्याची हिंमत नसल्याने या संघटनांना पुढे करून तुम्ही तुमची पोळी भाजून घेत आहात का,  मराठा जातीतीलच अनेक सरदार आणि दस्तुरखुद्द शिवाजी महाराज यांचे जवळचे नातेवाईक औंरंगजेबाला मिळालेले होते, शिवाजी महाराज यांच्याशी त्यांनी सदैव फितुरी आणि दगाबाजी केली हे दोन्ही कॉंग्रेसचे मराठा नेते सोयीस्कर का  विसरतात. ते अडचणीचे आहे म्हणून का, असो.

आमच्या भावना दुखावतात म्हणून खरा इतिहास दाबून टाकण्याचा हा प्रकार आणि त्याला राज्यकर्त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणखीन धोकादयक आहे. भावना दुखाविण्याच्या नावाखाली हिंदू द्वेषाची आणि या देशाचे जे मानबिंदू आहेत, त्यांची अवहेलना आणखी कितीकाळ सुरू राहणार आहे. शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अशी देशद्रोही विषवल्ली कठोर भूमिका घेऊन वेळीच ठेचून काढणे आवश्यक आहे. तेवढे धाडस गृहमंत्री आर. आर. पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा नेते कधी दाखवणार

3 comments:

  1. http://www.sahyadribana.com/2010/11/blog-post_7347.html
    अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले. ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मानपूर्वक प्रताप गडावर उभारणारा राजा एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल. शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे. त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्मग्रंथाना हानी पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मांडणी जाणीवपूर्वक करायची, असे प्रकार सर्रास घडत असतात. अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत, असेही कुणी समजू नये. सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख होता. नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख होता. काझी हैदर हा मुसलमान त्यांचा वकील, न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे. मुसलमान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अंगरक्षकापैकी अर्धे मुसलमान होते आणि ही प्रामाणिक, जीवाला जीव देणारी माणसे होती. आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केली नाही. असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मांडायचे आणि राजांच्या पदरी असणाऱ्या प्रामाणिक मुसलमान मावळ्याकडे दुर्लक्ष करायचे, हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुरते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “धार्मिक दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही टाळू शकतो.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रकाश म्हणतात ते खरय. राजेंच्या पदरी असलेल्या मुसलमान सेवकांची योग्य ती नोंद घ्यायलाच हवी आणि ती तशी झाली नसेल तर ते चुक आहे. पण त्याच वेळेस स्वराज्याच्या शत्रूंची पण माहिती असायला हवी. अफझलखान किवा शाहिस्तेखान यांच्या बाबतीत जे घडले तो पण इतिहासच आहे. महाराजांच्या अंगरक्ष बद्दल बोलायचे आणि त्याच वेळेस अफझल ला मात्र सोडायचे असे केले तर आधी ज्यांनी इतिहास लिहिला त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक?

      Delete
  2. अफजलखान हा मुस्लिम आहे म्हणून त्याचा किंवा त्याच्या नावावर मुस्लिम द्वेष करण्यात येतो, हे म्हणणे चुकीचे आहे असे मला वाटते. तसे झाले तर मग संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरू आणि मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारा कसाब यांचीही द्वेष ते केवळ मुसलमान आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेकडून केला जातो आहे, असे म्हणण्यासारखे आहे. सर्वसमान्य जनता किंवा बहुसंख्य हिंदूंकडून द्वेष केला जातो तो धर्मांध आणि राष्ट्रद्रोही मुसलमानांचा. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकला की भारतात फटाके फोडणाऱया भारतद्वेष्ट्या मुसलमानांचा. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल सर्वनाच आदर आहे. असो.

    पाठ्यपुस्तकातून अफजलखान वधाचे चित्र वगळणे, गणेशोत्सव किंवा शिवजयंतीला त्यांच्या भावना दुखावतात म्हणून मशिदीवरून वाद्ये न वाजतवता मिरवणूक नेण्याचा आदेश देणे, शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवून मुसलमानांचे लांगुनचालन करणे, या आणि अशा अनेक घटनांमधून कॉंग्रेस मुसलमानांचे जे लांगुनचालन करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य हिंदूंमध्ये राष्ट्रद्रोही आणि धर्मांध मुसलमानांविषयी चीड निर्माण झाली आहे.

    शिवाजी महाराज यांच्या सेवेत काही मुसलमान होते, ते त्यांच्याशी आणि स्वराज्याशी एकनिष्ठ होते, ही चांगलीच गोष्ट आहे. त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. स्वराज्याशी गद्दारी करणाऱयांना मग ते हिंदू असले आणि स्वताचे जवळचे नातेवाईक असले तरीही शिवाजी महाराज यांनी त्यांना क्षमा केलेली नाही. कायद्याने त्यांना जी शिक्षा आहे ती कठोरपणे बजावली आहे, हे विसरून चालणार नाही.

    शेवटी एकच कोणी काही म्हटले तरी शिवाजी महाराज यांनी आयुष्यभर मोगल राजाशीच लढा दिला. महाराष्ट्रावर मोंगलांनी केलेले आक्रमण, भग्न केलेली देवळे, लुटून नेलेली संपत्ती, आया-बहिणींची लुटलेली अब्रु, हिंदू नजतेची केलेली पिळवणूक या सगळ्याच्या विरोधात शिवाजी महाराज आक्रमक मुसलमानांच्या विरोधात लढले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची/ हिंदू पदपातशाहीची स्थापना केली. त्यामुळे शिवाजी महाराज यांना नाहक सर्वधर्म समभावात अडकवू नये, असे मला वाटते. तो त्यांचा मोठेपणा होता हे मान्य. पण केवळ तेच ठसवले जाऊ नये. आक्रमक मुसलमानांचा कर्दनकाळ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असे म्हणायला जीभ का अडखळावी

    ReplyDelete