गेल्या काही वर्षात मोबाईलचे अर्थात भ्रमणध्वनी आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे महत्व खूप वाढले असून नवी पिढीसाठी या वस्तू जिव्हाळ्याच्या ठरल्या आहेत. भ्रमणध्वनीवरील लघुसंदेशातून (एसएमएस) एक नवी भाषा तयार झाली आहे. थोडक्यात आणि मोजक्या शब्दांत आपले म्हणणे मांडणे व आपला निरोप दुसऱयांपर्यंत सहजतेने पाठवणे भ्रमणध्वनीमुळे शक्य झाले आहे.
नेहमीच्या एसएमएस बरोबरच भारतीय सण, उत्सवाच्या निमित्तानेही या लघुसंदेशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण केली जाते. यातून मोबाईल कंपन्यांचा गल्ला चांगला भरतो. हे सर्व लघुसंदेश म्हणजे छोट्या स्वरुपाच्या कविता किंवा चारोळ्या असतात. आपल्याला आलेला असा एखादा चांगला लघुसंदेश आपण आपले मित्र, नातेवाईक यांना पाठवतो. ती मंडळी त्यांच्या परिचितांना पाठवतात आणि असा एखादा लघुसंदेश वेगाने सर्वत्र पाठवला जातो.
आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी तील काही लघुसंदेशांचे संकलन येथे केले आहे. आपल्याकडेही असे काही नवे शुभेच्छा लघुसंदेश असतील, आपणते पाठवलेही असतील.
आनंदाची उधळण करत
चैत्र पंचमी दारी येता
नव्या ऋतूत उत्साहाची पालवी फुलावी
पानाफुलांचे तोरण बांधून दारी
इच्छा आकांक्षांची गुढी उभारू
आपुल्या दारी
शांत निवांत शिशिर सरला
सळसळता हिरवा वसंत आला
कोकिळेच्या सुरावटीसोबत
चैत्र पाडवा दारी आला
आयुष्य एक वीणा अन सुर भावनांचे
गा घुंद होऊन तू संगीत नववर्षांचे
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी
विसरून जाऊ जुने दुख
अन पाहू नवे सुख
करू नवा संकल्प मनाशी
स्वताला आणि समाजालाही समृद्ध करायचा
सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
रेशमी गुढी, कडुनिंबाचे पान
नववर्ष सुखाचे जावो छान
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात
उभारा गुढी सुखसमृद्धीची
सुरुवात करू या नववर्षाची
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करू या नव आशेची
तूर्तास येथेच थांबतो. आपल्या सर्वानाही गुढीपाडव्याच्या अर्थातच हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

No comments:
Post a Comment