मराठी साहित्य आणि ग्रंथव्यवहारात ११७ वर्षांचा वारसा लाभलेल्या मराठी ग्रंथसंग्रहाय, ठाणे यांनी दुर्मिळ ग्रंथांच्या खजिन्याची जपणूक केली आहे. संस्थेकडे आज सुमारे एक हजार २०० दुर्मिळ ग्रंथ आहेत. ‘प्रेस अॅक्ट’ कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी (१८६७) प्रकाशित झालेले विविध विषयांवरील ग्रंथ संस्थेकडे आहेत.संस्थेकडे असलेला हा पुस्तकांचा खजिना अत्यंत दुर्मिळ असून, त्याचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातून अभ्यासक आणि विद्यार्थी ठाण्यात येत असतात. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य अभ्यासकांना घरी नेता येत नाहीत.
संस्थेकडे असलेल्या या दुर्मिळ पुस्तकांच्या खजिन्यात कादंबरी या गटातील पुस्तके कमी आहेत. सर्वाधिक पुस्तके इतिहास, गणित, ज्योतिष, भूमिती, बीजगणित, मराठी भाषा, व्याकरण, शेती, धर्म, पौराणिक आदी विषयांची आहेत.
ग्रंथसंग्रहालयाकडे असलेल्या खजिन्यात ‘मराठय़ांची खबर’ (१८२९), हिंदुस्थानचा विकास-बाळगंगाधर शास्त्री जांभेकर (१८४६), बाळाजी जर्नादन भानू ऊर्फ नाना फडणीस यांची बखर-मॅग्लोनल्ड (१८२७), दशम स्कंधाच्या आर्या, अथ विराट पर्व आर्या-मोरोपंत (१८४० व १८४८), अशौच विचार-बाळकृष्ण भिकाजी राजवाडे (१८४१), मराठी भाषेचे व्याकरण-दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८३६), मराठी भाषेचे व्याकरण-शास्त्री फडके (१८५०) या आणि अन्य अनेक पुस्तकांचा समावेश आहे.
ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष पां. के. दातार यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले की, संस्थेकडे असे दुर्मिळ सुमारे एक हजार २०० ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथांची आम्ही झेरॉक्स प्रत तयार केली आहे. हे सर्व ग्रंथ दुर्मिळ असल्याने ते सभासद किंवा अन्य कोणाला वाचण्यासाठी घरी देत नाही. ज्यांना हा ग्रंथ पाहायचा आहे, त्याला आम्ही त्याची झेरॉक्स प्रत उपलब्ध करून देतो. तीसुद्धा अभ्यासकाने ग्रंथालयात बसूनच वाचायची आम्ही वाचकाला परवानगी देतो.
संस्थेकडे असलेले सर्व ग्रंथ योग्य पद्धतीने जतन करायचे आहेत. अत्याधुनिक पद्धतीने हे काम करण्याचा विचार आहे. अर्थात त्यासाठी खर्चही खूप आहे. त्यामुळे सध्या तरी जमेल तसे हे काम आम्ही करत असल्याचेही दातार म्हणाले.
पां. के. दातार यांचा संपर्क ०९८३३६१२८४७
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे दूरध्वनी संपर्क
०२२-२५४०६७८७/२५४४२२५१
ई-मेल info@mgst.in
(ही बातमी लोकसत्ता-मुंबई व ठाणे वृत्तान्तमध्ये प्रसिद्ध झाली आहे.)
नमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.
23 November 2010
14 November 2010
मराठी अभिमान गीताचे मार्केटिंग
ठाणे येथे पुढील महिन्यात भऱणाऱया ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कौशल इनामदार यांने संगीत दिलेल्या मराठी अभिमान गीताने होणार आहे. हे अभिमान गीत म्हणजे ज्येष्ठ दिवंगत कवी सुरेश भट यांनी लिहिलेली कविता आहे. भट यांची लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी ही कविता अनेक वर्षांपू्वीच प्रसिद्ध झालेली आहे. या कवितेलाच कौशल यांनी वेगळ्या पद्धतीने चाल लावून आणि अनेक गायकांकडून गाऊन घेऊन मराठी अभिमान गीत म्हणून लोकांपुढे आणले आहे.
खासगी एफएम वाहिन्यांवर मराठी गाणी वाजवली जात नाहीत. त्यामुळे कौशल इनामदार यांनी मराठी भाषेचे अभिमान गीत तयार केले. त्याचे चांगल्या प्रकारे मार्केटिंगही केले गेले. प्रसारमाध्यमानीही त्याला उचलून धरल्यामुळे त्याचा खूप बोलबाला झाला. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बीग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनीही कौशलचे आणि त्याच्या या अभिमान गीताचे कौतुक केले होते. मला प्रश्न पडतो की या पू्र्वी मराठी भाषा, महाराष्ट्र यांचा गौरव करणारी गाणी झाली नव्हती का, ही लिहिलेली गाणी लोकांच्या मनातून हद्दपार झाली आहेत का, आज ही गाणी कोणाला किंवा तरुण पिढीला आवडत नाही का, जर यांची उत्तर नाही अशी असतील तर कौशल इनामदार यांच्या अभिमान गीताचे एवढे कौतुक कशासाठी.
राजा बढे यांनी लिहिलेले, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेले जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेले, शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केलेले आणि ज्योत्स्ना भोळे व स्नेहल भाटकर यांनी गायलेले बहु असोत सुंदर की संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ही दोन गाणी आजही प्रत्येकाच्या ओठावर आहेत. किंवा महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय राष्ट्र महान कोटी कोटी प्राणांतून उसळतो एक तुझा अभिमान हे गाणेही आजही लोकप्रिय आहे. हे गाणे चकोर आजगावकर यांनी लिहिलेले असून त्याचे संगीत श्रीनिवास खळे यांचे तर स्वर शाहीर साबळे यांचा आहे. राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले मंगल देशा पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा हे गाणेही महाराष्ट्राचे अभिमान गीत होऊ शकते. याचे संगीत वसंत देसाई यांचे असून ते जयंवत कुलकर्णी यांनी गायले आहे. माधव ज्युलीयन यांची मराठी असे आमुची मायबोली हे गाणेही प्रत्येकाला आठवत असलेच
सर्व सांगताना सुरेश भट यांचे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या कवितेला मला कमी लेखायचे नाही. अन्य महाराष्ट्र गाण्यांप्रमाणेच हे गाणेही लोकप्रिय असून त्याची यापूर्वीच कॅसेट, रेकॉर्डही निघालेली आहे. मला तर कौशल इनामदार यांनी आत्ता या गाण्याला जी चाल लावली आहे त्यापेक्षा याची जुनी चाल अधिक आवडते. त्यात जोश वाटतो.
साहित्य संमेलन आयोजकांना ठाण्यातील साहित्य संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीतानेच करायची होती तर कौशल इनामदारच्या पूर्वी झालेली महाराष्ट्र गीते किंवा सुरेश भट यांचे हे पूर्वीचे गाणे होतेच ना. मग पूर्वसुरींचे देणे असताना नव्या चालीतील हे गाणे ठेवायचा अट्टाहास का. काहीतरी वेगळे करतो आहोत, असे दाखवयाचे म्हणून की कौशल यांच्या या अभिमान गीताचा प्रसारमाध्यमातून बोलबाला झाला आहे म्हणून...
जुनी महाराष्ट्र गीते आणि कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले मराठी अभिमान गीत यांची तुलना केली असता मला जुनीच गाणी अधिक जोशपूर्ण वाटतात. अर्थात प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते. ही सर्व गाणी येथे ऐकण्यासाठी मी खाली काही लिंक दिल्या आहेत.
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=ca6fa56a73ae2b08b807176dc13bf6eb
येथे ऐकता येईल.
बहु असोत सुंदर संपन्न की महान प्रिय आमुचा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=64cb53bc-0b5b-45cf-b5d7-7027bca3ebd6&title=Priya%20Amucha%20Ek%20Maharashtra%20Desh%20Ha.mp3
येथे ऐकता येईल.
गोविंदाग्रज यांचे मंगलदेशा पवित्रदेशा हे गाणे
http://www.video4viet.com/music.html?act=play&id=&eid=e639491e-d529-4aeb-99a1-3b0e9d448248&title=12%20Mangal%20Desha%20Pavitra%20Desha%20Maharashtra%20Desha.wma येथे ऐकू शकाल.
आणि या सगळ्या गाण्यांनंतर कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले हे गाणे ऐका. http://www.youtube.com/watch?v=Txa_J7lPRhg
हे गाणे ऐकल्यानंतर/ पाहिल्यानंतर आता तुम्हीच ठरवा जुनी महाराष्ट्र गाणी की हे गाणे अधिक प्रभावी आणि जोशपूर्ण वाटते.

13 November 2010
आता खरी कसोटी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत अखेर मनसे विऱोधी पक्ष म्हणून विराजमान झाला. पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱया मनसेने शिवसेना, भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसला धूळ चारली आणि राज ठाकरे यांचे २७ नगरसेवक निवडून आले. पहिल्याच निवडणुकीत मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.
निवडणुकीच्या काळात राज ठाकरे कल्याण-डोंबिवलीत ठाण मांडून बसले होते. मनसेचे उमेदवार निवडताना त्यांनी जास्तीत जास्त तरुण, सुशिक्षित, उच्चशिक्षितांना संधी दिली. मनसेच्या सर्व उमेदवारांनाही कल्याण-डोंबिवलीत भरभरून मतदान झाले. त्यामुळेच मनसेला सत्ता स्थापन करता आली नसली तरी सर्वात जास्त मते घेतलेला मनसे हाच पक्ष ठरला आहे.
सत्ता दिलीत तर पूर्ण बहुमत द्या, अपक्षांच्या हनुवट्यांना मला हात लावायला लावू नका, असे निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी सांगितले होते. मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले तरी एकहाती सत्ता त्यांना स्थापन करता आली नाही. सत्तेसाठी घोडेबाजार न करता राज ठाकरे यांनी विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय़ घेतला. पण आता त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे.
महापालिका सभागृहात आता त्यांचे २७ नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे पालिका नियम आणि लोकशाहीची सर्व आयुधे वापरून त्यांनी सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवला पाहिजे. नागरी हिताची कामे सत्ताधाऱयांकडून करवून घेतली पाहिजेत. मनसे विरोधासाठी विरोध करणार नाही तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करून दाखवू, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
गेली साडेबारा वर्षे शिवसेना-भाजप युती आणि अडीच वर्षे दोन्ही कॉंग्रेसने राज्य केले आहे. त्यावेळीही महापालिकेत विरोधी पक्ष सक्षम नव्हताच. अनेकदा तर तो सत्ताधाऱयांच्या ताटाखालचे मांजर झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे मनसेची जबाबदारी वाढली आहे. लोकांनी भरभऱून मते देऊन तसेच शिवसेना-भाजपचे पारंपरिक बालेकिल्ले उध्वस्त करत मनसेच्या नवख्या पण सुशिक्षित उमेदवारांना निवडून दिले आहे.
मतदारांनी टाकलेला हा विश्वास मनसेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २७ नगरसेवकांनी सार्थ करून दाखवावा. पाच वर्षांच्या काळात आपल्या हातून वावगे काही घडणार नाही, सत्ताधाऱयांच्या चुकीच्या धोरणांना साथ देणार नाही याची त्यांनी मनोमन काळजी घेतली पाहिजे. ज्या प्रभागातून आपण निवडून आलो आहोत, त्या प्रभागीत समस्या, नागरिकांचे प्रश्न यात जातीने लक्ष घातले पाहिजे. निवडणुकीच्या काळात उघडलेली जनसंपर्क कार्यालये बंद न करता दररोज सुरू ठेवावी. त्या कार्यालयात दररोज ठराविक वेळेत मनसेच्या नगरसेवकांनी बसावे, नागरिकांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे आणि मुख्य म्हणजे आपला नगरसेवक रस्त्यावरून पायी फिरतोय, प्रभागात फिरताना दिसतोय हे पाहायला मिळावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
कोणताही भ्रष्टाचार, भानगडी, टक्केवारी यात आपण गुंतणार नाही याची मनसेच्या सर्व नगरसेवकांनी खबरदारी घ्यावी आणि पाच वर्षांचा कारभार अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शी ठेवावा. असे झाले तरच मतदारांनी मनसेवर आणि त्यांच्या नगरसेवकांवर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरेल आणि या विश्वासाला तडा जाणार नाही. राज ठाकरे आणि पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते या बाबत वेळोवेळी नगरसेवकांना मार्गदर्शन करतीलच. कल्याण-डोंबिवलीतील सर्वसामान्य मतदारांना आता मनसेकडून खूप अपेक्षा आहेत. मनसेची आता खरी कसोटी आहे...

25 September 2010
पूर्वजांचे स्मरण करणारा पितृपंधरवडा
अनंत चतुर्दशीनंतर असलेली पौर्णिमा संपली की त्या दिवसापासून सुरू होणारा पंधरवडा हा ‘पितृपंधरवडा’ म्हणून ओळखला जातो. पंचागानुसार सांगायचे झाले तर भाद्रपद महिन्यातील भाद्रपद कृष्ण एक ते भाद्रपद अमावास्या हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून पाळण्यात येतो.
पितृपंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करणारा, त्यांची आठवण ठेवून श्राद्धविधी करण्याचा पंधरवडा मानण्यात येतो. गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणारा पितृपंधरवडा हा काही जणांच्या दृष्टीने शुभकार्यासाठी निषिद्ध मानण्यात येतो. त्यामुळे या पंधरा दिवसांत कोणतेही शुभकार्य, नवीन खरेदी, लग्न जुळविणे, गृहखरेदी इत्यादी कामे केली जात नाहीत.
गणेशोत्सवकाळात किंवा पितृपंधरवडा संपल्यानंतर सुरू होणारा नवरात्रौत्सव, दसरा किंवा दिवाळीत व्यापारी, दुकानदार यांच्यादृष्टीने ‘खरेदीचा सीझन’ तेजीत असतो. या दिवसात बाजारपेठेत अक्षरश: कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. तर पितृपंधरवडय़ाचा कालावधी नवीन खरेदी आणि व्यापाऱ्यांसाठी मंदीचा काळ समजला जातो.
धार्मिक ग्रंथांत दिलेल्या माहितीनुसार आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता किंवा आदर व्यक्त करण्याच्या या दिवसांना पितृपंधरवडा किंवा श्राद्धपक्ष असे म्हटले जाते. यंदाच्या वर्षी २४ सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू झाला असून तो ७ ऑक्टोबपर्यंत आहे. ७ ऑक्टोबर रोजी भाद्रपद अमावास्या असून ती सर्वपित्री अमावास्या म्हणूनही ओळखली जाते.
कोणाला पितृपंधरवडय़ात पूर्वजांचे स्मरण करण्यास जमले नाही, या काळात श्राद्ध करता आले नाही तर किमान शेवटच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावास्येला तरी ते केले जावे, असे मानले जाते. पितृपंधरवडय़ात ज्या तिथीला व्यक्ती निधन पावली असेल त्या तिथीला श्राद्ध, तर्पण असे विधी केले जातात. जेवणाचे ताट कावळ्यासाठी ठेवले जाते. कावळ्याच्या रुपाने ते आपल्या पितरांना पोहोचते, अशी समजूत आहे.
पितृपंधरवडय़ात आपल्या पितरांचे स्मरण आणि पूजन केले तर त्यांना गती मिळते, ते संतुष्ट होतात अशी सर्वसामान्यांची श्रद्धा आहे. या काळात आपले पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांकडे येत असतात. त्यामुळे या दिवसांत ती व्यक्ती निधन झालेल्या तिथीला श्राद्ध, तर्पण केले तर आपले पितर सुखी होतात, आपल्या कुटुंबियांनी आपली आठवण ठेवली आहे, हे पाहून त्यांना आनंद होतो, अशी पूर्वापार समजूत हिंदू धर्मात आहे. त्यामुळेच हिंदू धर्मात पितृपंधरवडय़ाला खूप महत्त्व आहे.
पितृपंधरवडय़ाच्या काळात भाद्रपद कृष्ण नवमी ही अविधवा नवमी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद त्रयोदशी / चतुर्दशी या दिवशी शस्त्राने मरण पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते. या कालावधीत निधन पावलेल्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध, तर्पण केले जाते.
रुढी-परंपरेचा पगडा असणारी किंवा हे केल्याने आपले काही नुकसान तर होणार नाही ना, मग परंपरेने जे सांगितले आहे, ते केले तर काय बिघडले? असे मानणाराही मोठा वर्ग समाजात आहे. तो कोणत्याही एका विशिष्ट जातीचा नाही. हिंदू धर्मातील बहुतेक प्रत्येक जातीमध्ये त्यांच्या परंपरेनुसार पितृपंधरवडय़ात पितरांचे स्मरण केले जाते. तर काही मंडळींचा या गोष्टींवर विश्वास नसतो. त्यांच्या दृष्टीने हे सर्व थोतांड असून काही मूठभर मंडळींनी धर्माच्या नावावर पैसे कमाविण्यासाठी निर्माण केलेल्या रूढी व परंपरा असल्याचेही त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे ही मंडळी कोणताही धार्मिक विधी किंवा कर्मकांड न करता आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाने समाजातील स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला पैशांच्या, कपडय़ांच्या स्वरूपात मदत करतात.
समाज कितीही पुढारला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी धार्मिक रूढी आणि परंपरांचा पगडा जोपर्यंत आपल्या समाजावर आहे तोपर्यंत पितृपंधरवडा पाळला जाणार. फक्त त्यात काळानुरूप काही बदल होत जातील हे नक्की.
(माझा हा लेख लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २५ सप्टेंबर २०१० च्या अंकात पान-१ वर प्रसिद्ध झाला आहे)

24 September 2010
साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही
विद्यमान पद्धतीला सध्यातरी पर्याय नाही
मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला सूर
संमेलनाध्यक्षपद निवडणूक
प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदाच्या विद्यमान निवडणूक पद्धतीत बदल व्हावा, अशी चर्चा होत असली तरी विद्यमान निवडणूक पद्धतीला सध्यातरी सक्षम आणि ठोस पर्याय नाही, असा सूर या संदर्भात मुंबई मराठी साहित्य संघाकडे व्यक्त झाला असल्याची माहिती संघाच्या सूत्रांकडून देण्यात आली. मुंबई मराठी साहित्य संघ ही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असून विद्यमान निवडणूक पद्धतीविषयी संघाने मान्यवरांची मते जाणून घेतली होती. त्यातून उपरोक्त सूर व्यक्त झाला आहे.
साहित्य संमेलन आणि अध्यक्षपदाची निवडणूक हा कायम वादाचा विषय राहिला आहे. महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थेचे मतदार तसेच संमेलन आयोजक निमंत्रक संस्थेचे पदाधिकारी संमेलनाध्यक्ष निवडणुकीत मतदान करतात. मात्र ही संख्या खूप कमी आहे. यंदाच्या वर्षी सुमारे ७९० मतदार मतदान करणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष इतक्या कमी संख्येत असलेल्या मतदारांनी ठरवणे हे योग्य नसल्याची टीका करण्यात येते. तसेच संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्याने काही ज्येष्ठ साहित्यिकांना ही पद्धत मान्य नसल्याने त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे यात काही बदल करता येईल का, अशी चर्चा नेहमी सुरू असते. त्या पाश्र्वभूमीवर मुंबई मराठी साहित्य संघाने ही मते जाणून घेतली होती. साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, मान्यवर साहित्यिक आणि साहित्यविषयक संबंधित घटकांकडे संमेलनाध्यक्षपद निवडीच्या विद्यमान पद्धतीविषयी मते जाणून घेतली होती. त्यावेळी विद्यमान निवडणूक पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी सध्या योग्य आणि सक्षम पर्याय समोर नसल्याचे मत या मंडळींनी व्यक्त केले होते.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या मंडळींची नावे मागवायची आणि महामंडळाच्या कार्यकारिणीत त्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करायचे. म्हणजे निवडणूक न होता संमेलनाध्याची निवड करता येईल, असा एक पर्याय समोर आला होता. मात्र त्यामुळे आणखी वाद आणि गोंधळ उडेल, असे एक मत पुढे आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आलेल्या नावांमधून केवळ एका नावाची निवड करायची झाल्यास कार्यकारिणीतील सदस्यांवर राजकीय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ शकतो किंवा प्रादेशिकतेचा विचार करूनही एखाद्याची निवड केली जाऊ शकते. तसे होण्यापेक्षा विद्यमान पद्धतीत काही त्रुटी असल्या तरी मतदान लोकशाही पद्धतीने होत असल्याने तक्रार करायला वाव नाही.
ही प्रक्रिया राबवताना जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सध्या तरी हीच पद्धत योग्य वाटते. एकूण मतदार संख्येत वाढ करणे हा पर्याय विचार करण्यासारखा असल्याचे मतही व्यक्त करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २४ सप्टेंबर २०१० च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे)

22 September 2010
देवा तुझ्या दारी आलो...
गीतगणेश-९
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या ‘गीतगणेश’ लेखमालिकेत आजच्या शेवटच्या भागात ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गाणे घेतले आहे. ‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे.
विविध वाहिन्यांवरील संगीतस्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वत: अजय गोगावले यांनी गायले असून ‘अजय-अतुल’ यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले आहे.
‘नटरंग’ या चित्रपटातील ‘आता वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’, ‘नटरंग उभा’ लोकप्रिय झालेल्या गाण्याप्रमाणेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’, ‘अगबाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘साडेमाडेतीन’, ‘एक डाव धोबीपछाड’ या चित्रपटातील गाण्यांनाही रसिकांची दाद मिळाली. ‘जोगवा’ या चित्रपटासाठी अजय-अतुल यांना सवरेत्कृष्ट संगीताचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
संगीतकार अजय-अतुल हे दोघे भाऊ असून त्यांनी संगीत दिलेला ‘विश्वविनायक’ हा अल्बमही खूप गाजला. श्रीगणेशावरील असलेल्या या आल्बमधील गाणी एस. पी. बालसुब्रमण्यम, शंकर महादेवन यांनी गायली आहेत.
‘उलाढाल’ चित्रपटातील हे गाणे ऐकताना आपणही त्यात रंगून जातो. ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली अनेक गाणी, लावण्या मराठी संगीत रसिकांच्या मनात घर करून आहेत. ‘अष्टविनायक’ या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेले ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायकांचा महिमा सांगणारे गीत खेबुडकर यांनीच लिहिले आहे.
‘उलाढाल’मधील ‘देवा तुझ्या दारी आलो’ हे गणपतीवरील त्यांचे आणखी एक गाजलेले गीत. साधी, सोपी परंतु सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारी आणि गुणगुणायला लावणारी शब्दरचना हे खेबुडकर यांच्या आजवरच्या गीतांचे प्रमुख वैशिष्टय़. तीच परंपरा खेबुडकर यांनी ‘देवा तुझ्या दारी आलो’ मध्येही जपली आहे.
अजय-अतुल गोगावले बंधुंमध्ये अजय हे गातातही. ‘नटरंग’ मधील ‘खेळ मांडला’, ‘सावरखेड एक गाव’ मधील ‘आई भवानी तुझ्या कृपेने’, ‘मल्हारवारी’ ही त्यांनी गायलेली गाणी रसिकांना परिचयाची आहेतच. त्यात ‘देवा तुझ्या दारी आलो’चाही समावेश होतो.
हे गाणे ऐकताना प्रत्येकजण गणपतीच्या भक्तीत अक्षरश: न्हाऊन निघतो. गाण्याच्या सुरुवातीला अजय यांनी आपल्या आर्त स्वरातून गणपतीला घातलेली ‘देवा तुझ्या दारी आलो’ ही साद आणि ‘मोरया मोरया’ हा गजर गणेशभक्तांच्या मनाचा ठाव घेतो. ‘शिवगर्जना’ या प्रसिद्ध ढोल-पथकाच्या साथीने अजय-अतुल यांनी या लोकप्रिय ठरलेल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण केले आहे.
गाण्याचा शेवट ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोटय़ानकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी’ या पारंपरिक श्लोकाने करण्यात आला आहे.
गाण्यातील ढोल-ताशा, मोरया-मोरयाचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’ हा जयजयकार, तुतारीचा निनाद आणि शेवटच्या गजर आपल्याही मनात नकळत वीररस आणि गणेशभक्ती निर्माण करतो. खेबुडकरांचे शब्द, अजय-अतुल यांचे संगीत व अजय यांचा स्वर असा सुंदर मिलाफ या गाण्यात झाला आहे.
हे संपूर्ण गाणे पुढीलप्रमाणे
देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया
ए देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया, तुझी समिंदराची माया
मोरया, मोरया ।।ध्रु।।
ओंकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाडं, येली, पानासंग फुल तू संगंधी,
भक्तांचा पाठीराखा, गरिबांचा वाली
माझी भक्ती, तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक, उद्धार कराया ।।१।।
आदि अंत तूच खरा, तूच बुद्धिदाता
शरण आलो आम्ही तुला पायावर माथा
डंका वाजे दहा दिशी गजर नामाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया ।।२।।
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २२ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख प्रसिद्ध झाला आहे)

21 September 2010
ओंकार प्रधान रुप गणेशाचे...
गीतगणेश-८
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगांतून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी गणपतीचे वर्णन ‘ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या’ असे केले आहे. ज्ञानेश्वरांप्रमाणेच अन्य संतांनीही गणेशाला वंदन केले असून त्यात संत तुकारामही आहेत. संत तुकाराम यांची ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही रचना गणपतीचे भक्त आणि संगीतप्रेमी रसिकांनाही परिचयाची आहे. याचे संगीत कमलाकर भागवत यांचे असून स्वर सुमन कल्याणपूर यांचा आहे.
कमलाकर भागवत हे जुन्या पिढीतील प्रतिभावान संगीतकार. त्यांची खूप गाणी गाजली. अनेक वर्षांनंतरही भागवत यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. यात ‘उठा उठा चिऊताई’, ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’, ‘दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट’, ‘देह जावो अथवा राहो’ आदी तसेच इतरही अनेक गाण्यांचा समावेश आहे.
खरे तर तुकाराम, नामदेव, एकनाथ आदी सर्व संतांनी विठ्ठलाची भक्ती आणि स्तुती केली. या सर्व संतांनी विठ्ठलाला आपला सखा मानले. आपले सुख-दु:ख त्याला सांगितले. ज्ञानेश्वर आणि तुकारामांसह सर्व संतांचे अभंग मराठी भाषा आणि संस्कृतीत अढळ स्थान मिळवून आहेत.
इतक्या वर्षांनंतरही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा, जातीभेद, विषमता यांच्यावरही संतांनी आपल्या अभंगांतून आसूड ओढले आहेत. तुकारामांचे ‘सुंदर ते ध्यान’, ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’, ‘कन्या सासुरासी जाये’, ‘खेळ मांडियला वाळवंटी काठी’, ‘जे का रंजले गांजले’ आणि इतरही अनेक अभंग प्रसिद्ध आहेत.
संत तुकाराम यांचे बहुतांश अभंग ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनी ‘अभंग तुक्याचे’ या कॅसेटमध्ये संगीतबद्ध केले आहेत. लता मंगेशकर यांच्या आवाजात ते प्रसिद्ध आहेत.
‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे’ ही तुकारामांची रचना संगीतकार कमलाकर भागवत आणि गायिका सुमन कल्याणपूर यांच्यामुळे अधिक प्रसिद्ध झाली आहे. गणपतीची स्तुती असलेला तुकारामांचा हा अभंग अवघ्या चार कडव्यांचा आहे. ‘ओम’ हा शब्द आप जेव्हा उच्चारतो तेव्हा अ, उ आणि म हे स्वर म्हणत आपण ‘ओम’चा उच्चार करतो. ओंकार हेच गणेशाचे मुख्य स्वरूप असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन प्रमुख देवांचे ते जन्मस्थान आहे. हे तीनही देव अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक आहेत. सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. गणपती किंवा गजाजन हा मायबाप असल्याचेही तुकाराम या अभंगात सांगतात.
मन प्रसन्न करणारा सुमन कल्याणपूर यांचा स्वर आणि कमलाकर भागवत यांचे संगीत यामुळे हे गाणे ऐकताना आपणही अगदी तल्लीन होऊन जातो.
हा अभंग पुढीलप्रमाणे
ओंकार प्रधान रुप गणेशाचे
गे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।ध्रु।।
अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला ।।१।।
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ।।२।।
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पाहावी पुराणे व्यायाचिया ।।३।।
(लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २१ सप्टेंबर २०१० च्या अंकात माझा हा लेख गीतगणेश या लेखमालिकेत प्रसिद्ध झाला आहे)

Subscribe to:
Posts (Atom)