नमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.
08 November 2009
मोबाईलवर मराठी टायपिंग
मोबाईल ही आता चैनीची गोष्ट न राहता गरजेची आणि आवश्यक अशी बाब झाली आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में असे स्लोगन देणाऱया कंपनीने मोबाईल हा सर्वसामान्य माणसांच्या हातात आणून ठेवण्याचे मोठे काम केले. आजकाल तर मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना जास्त सुविधा कोण देतो आणि आपल्याकडे ग्राहकांना कोण खेचून घेतो यात चढाओढ लागलेली असते. विविध नामांकित कंपन्यांच्या मोबाईल हॅण्डसेटमुळे ग्राहकांना कोणता घेऊ आणि कोणता नको, असा प्रश्न पडतो. मला असे वाटते की ज्या मोबाईलमध्ये मराठीतून पाठवलेला एसएमएस वाचता येतो आणि मराठीतून एसएमस लिहिता येतो, तोच मोबाईल शक्यतो विकत घ्यावा. मराठीतून आलेला एसएमएस वाचणे खूप छान वाटते.
माझा नोकियाचा ३११० क्लासिक हा फोन असून त्यावर मराठीसह हिंदी, गुजराथी, बंगाली आणि अन्य काही भारतीय प्रादेशिक भाषांमधून आपल्याला लिहिता येऊ शकते आणि त्या प्रादेशिक भाषेत पाठवलेला एसएमएस वाचताही येऊ शकतो. मराठीतून एसएमएस लिहिताना सुरुवातीला थोडे कठीण जाते परंतू अवघ्या चार-पाच दिवसात आपला हात त्या त्या कीजवर बसला की टाईप करणे खूप सोपे जाते. मग इंग्रजी किंवा रोमन भाषेतून (how are you/ tu kasa ahes) लिहिण्यापेक्षा आपल्याला थेट तू कसा आहेस, असे मराठीत लिहिता येऊ शकते. मराठीतून आपल्या मातृभाषेतून पाठवलेला एसएमएस वाचायलाही खूप छान वाटते.
सर्वाच्या माहितीसाठी नोकिया ३११० क्लासिकवरील मराठी शब्द जेथे आहेत, त्या जागा अशा. सर्वसाधारणपणे नोकियाच्या मोबाईल हॅण्डसेटवर अशाच प्रकारचे शब्द असतात.
४ जीएचआय-क, ख, ग, घ./ ५ जे, के, एल-च, छ, ज, झ/ ६ एमएएनओ-ट, ठ, ड
७ पी, क्यु, आर, एस-त, थ. द, ध/८ टी, यु, व्ही-प, फ, ब, भ, म/९ डब्लु, एक्स, वाय-य, र, ल, व, स
तसेच १ या आकड्यावर पाय मोडणे, रफार, पूर्णविराम, २ या आकड्यावर अ, आ, इ, ई आणि ३ या आकड्यावर ए, औ ओ अशा अक्षरे आहेत. मराठी बाराखडी एकदा लक्षात ठेवली की मोबाईलवर टाईप करणे खूप सोपे जाते.
समजा सुप्रभात असे आपल्याला लिहायचे असेल तर
९ आकड्यावर स पर्यंतयेऊन २ आकड्यावरुन ह्रस्व (पहिला) उकार द्याचया. प्र हे अक्षर टाईप करण्यासाठी ८ आकड्यावर येऊन प दाबायचा, नंतर प चा पाय मोडून ९ आकड्यावरील र अक्षर दाबायचे. हे वाचतांना खूप कठीण वाटेल, पण एकदा करायला लागलो की खूप सोपे वाटते. मी सध्या सगळे एसएमएस मराठीतूनच पाठवत आहे. इतकेच नव्हे तर एमपी थ्री (म्युझिक फाईल/मिडियामध्ये जी गाणी अनुक्रमाने आपण पाहतो ती ) मधील सर्व गाण्यांच्या सुरुवातीची ओळही मी मराठीतून टाईप केली आहेत. मराठी गाण्यांची ओळ इंग्रजीतून वाचण्यापेक्षा मराठीतून वाचणे मस्त वाटते.
असो, आपणही आपल्या मोबाईलवर असा प्रयोग करुन पाहा, आपल्यालाही ते नक्की जमेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नमस्कार शेखर. पुन्हा एकदा जोशीपुराण या ब्लॉगचे पुनरुज्जीवन केल्याचा आनंद वाटतो ना. आता मी रोज शक्य नसले, तरी नियमितपणे हा ब्लॉग पाहीन. अरविंद तेलकर
ReplyDelete