09 November 2009

बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद

ब्राह्मण, ब्राह्मण्य किंवा ब्राह्मणवाद यावर टीका करण्याची सध्या एक फॅशन झाली आहे. ब्राह्मणांवर टीका केली म्हणजे आपले पुरोगामीत्व सिद्ध होते, असे काही मंडळींना वाटते. यातूनच पूर्वीच्या ब्राह्मण इतिहासकारांचे संशोधन कसे चुकीचे आहे, हे सांगण्याची सध्या अहमहमिका लागली आहे. ब्राह्णण इतिहासकारांनी केलेले संशोधन आणि त्यांचे पांडित्य केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून नाकारण्यात येत आहे. ब्राह्मण इतिहासकारांचे संशोधन जर नव्या पुराव्याच्या आधारे चुकीचे निघाले, तर तसे म्हणायला किंवा ते स्वीकारायला काही हरकत नाही, पण त्यासाठी भक्कम पुरावा आणि अभ्यास हवा. किस्त्रीम च्या दिवाळी अंकात याच महत्वाच्या विषयावर श्यामसुंदर द. मुळे यांनी बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर विविध संदर्भ आणि दाखले देत एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. खरे म्हणजे तो मुळातून वाचला पाहिजे. ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही जातीने ब्राह्णण नव्हती, तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा ब्राह्मणांनी खून केला, संभाजीला ब्राह्मणांनी पकडून दिले, त्यामुळे त्याला हालहाल करुन औरंजेबाने ठार मारले, ब्राह्णण हेच खरे शिवाजीचे शत्रू होते, त्यांनी शिवाजीला विष घालून मारले, दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरु नव्हते. रामदास स्वामी हे औरंजेबाचे गुप्तहेर होते, अशा प्रकारचे हे अब्राह्णण संशोधन आहे. ब्राह्मणेतर लेखकांचे हे लेखन प्रामुख्याने नकारात्मक आहे. मुख्य म्हणजे ते जाती द्वेषावर आधारित आहे. एेतिहासिक लेखन हे कथा-कादंबरीसारखे अलंकारिक आणि कल्पनारम्य असू नये, हे जसे खरे तसेच ते अतिद्वेषाने बरबटलेलेही असू नये, असे मुळे यांनी लेखात म्हटले आहे. शिवाजी महाराज यांचे काही शत्रू जसे ब्राह्णण होते तसेच ते शहाण्णवकुळी मराठा देखील होते. शिवाजी महाराजांना ज्या आप्तस्वकीयांनी छळले, त्यात संभाजी मोहिते, चंद्रराव मोरे, खंडोजी खोपडे, सुलतान जगदाळे, सर्जेराव घाडगे, सूर्याजी सुर्वे, कमलोजी व जसवंतराव कोकाटे, सिंदखेडचे दत्ताजी जाधव, कृष्णाजी काळभोर, जयवंत दळवी, कल्याण यादव, प्रतापराव मोरे, नाईकजी खराटे, बाजी घोरपडे, मोहिते मामा, केदारजी देशमुख, जवळीकर पाटील अशी नावे आहेत. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून असलेला दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आल्यानंतर आनंदाने टिऱया बडविणाऱया मराठा संघटनांनी बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना पाठ्यपुस्तकातून शिवाजीने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, हा मजकूर जेव्हा वगळण्यात आला तेव्हा का शेपट्या घातल्या होत्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केल्याबद्दल गांधीवादी समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या खुनाची सुपारी दिली जाते आणि आयुष्यभर शिवचरित्राचा अभ्यास व ध्यास घेतलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना खुनाची धंमकी दिली जाते, हा महाराष्ट्रातील बहुजनांचा सांस्कृतिक दहशतवाद मुस्लीम अतिरेक्यांपुढे मात्र नांगी टाकताना दिसतो, अशा शब्दात मुळे यांनी आपल्या लेखाचा समारोप केला आहे. आम्ही तुमच्याविरुद्ध काहीही लिहिले, तरी त्याबद्दल तुम्ही आम्हाला पुरावा मागायचा नाही. पण तुम्ही मात्र आमच्याविरुद्ध काहीही लिहावयाचे नाही. लिहाल तर याद राखा, असा ब्राह्मणेतर लेखकांचा सांस्कृतिक आणि एेतिहासिक दहशतवाद आहे. स्वातंत्र्योत्तर गेल्या पन्नास-साठ वर्षात महाराष्ट्रात शासन कोणाचे आहे, युतीच्या काळातील एक मनोहर जोशी यांचा अपवाद वगळता राज्यात ब्राह्मणेतर मख्यमंत्री सत्तारुढ झालेले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातही ब्राह्मणांचे स्थान नगण्य आहे. असे असूनही जर देहू आणि आळंदी यांच्या विकासातील फरक प्रकर्षाने जाणवत असेल तर त्यावा ब्राह्णण जबाबदार कसे, असे काही परखड सवालही मुळे यांनी या लेखात केले आहेत. बहुजनांच्या सांस्कृतिक दहशतवादाला आणि सातत्याने ब्राह्मणांना झोडपणाऱयांना मुळे यांनी या लेखाद्वारे विविध संदर्भ व दाखले देत उघडे पाडले आहे. त्याबद्दल मुळे यांचे अभिनंदन.

8 comments:

  1. पुरुषोत्तम खेडेकर यांची पुस्तके वाचा. अगदी प्रत्येक वाक्य ब्राह्मणविरोधी आहे. मराठा तरुणांच्या डोक्यात असं विष भरुन काय साधतात कोण जाणे?

    ReplyDelete
  2. मोजक्या शब्दात पण स्पष्ट परखड मुद्दे...आवडला लेख!!!

    ReplyDelete
  3. खुप छान लेख झाला आहे. तुझं म्हणण अगदी पटत...मराठा असुनही. तसं पाहिल गेलं तर मराठा समाजालाही या संघटनाच सगळंच म्हणण पटत असं थोडंच आहे. कुणीही कितीही पेटवलं तरी प्रत्येकाला त्याच भल बुरं समजतच ना ! विवेचन खुप छान केलं आहेस तु.

    -अजय

    ReplyDelete
  4. You have the right to contradict their views. there is no point in branding them as terrorist. It will complicate the matter further.

    ReplyDelete
  5. आवर्जून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
    शेखर

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख. आणखी लिहावे. अन्यायासमोर मुग गिळून बसणे म्हणजे स्विकृती दर्शावणे. म्हणून अधिकाधिक लिहावे, लोकांसमोर मांडावे.

    ReplyDelete
  7. राजेश,
    नमस्कार
    आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

    ReplyDelete