10 November 2009

उलट्या बोंबा

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात अबू आझमी यांच्याबाबतीत जो काही प्रकार घडला त्या बद्दल सर्वसामान्य जनतेत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र अबू आझमी सारख्या माणसाबद्दल जे काही झाले ते चांगलेच झाले, अशी प्रतिक्रिया बहुतांश लोकांकडून व्यक्त होत आहे. फक्त त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो मार्ग अवलंबिला तो चूक की बरोबर याबद्दल वाद असू शकतो. मुळात सर्वस्वी चूक ही अबू आझमी यांची आहे. एकीकडे भारतीय राज्य घटनेचा आधार घेऊन अबू आपण हिंदीतून घेतलेल्या कृत्याचे समर्थन करत आहेत. मात्र अबू यांची ही कृती म्हणजे उलट्या बोंबा आहेत. मनसेने विधीमंडळात केलेली ही कृती अचानक केली नव्हती. मराठी ही राजभाषा असून त्याचा सगळ्यांनी सन्मान करावा आणि त्यासाठी सर्व आमदारांनी मराठीतूनच शपथ घ्यावी, असे आवाहन राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. खरे तर त्यात काही चूक नाही. परंतु अबू आझमी यांनी मुद्दामहून व मनसे आणि मराठी माणसांना डिवचण्यासाठी मी हिंदीतूनच शपथ घेणार असे जाहीर केले होते. अबू यांना अचानक हिंदीचा पुळका कसा काय आला. तुम्ही जर इतकी वर्षे मुंबई व महाराष्ट्रात राहात आहात तर तुम्हाला किमान काही वाक्ये तरी मराठीत बोलता आलीच पाहिजेत आणि तुम्ही मराठीचा आदर केला पाहिजे, अशी अपेक्षा कोणी ठेवली तर त्यात काही चूक नाही. त्यामुळे अबू यांनी शपथ घेताना मी अल्लाला स्मरून शपथ घेतो की, असे शब्द मराठीत बोलून आता पुढील वाक्ये मी हिंदीत बोलतो, असे सांगितले असते तरी कदाचित इतका गदारोळ झाला नसता. पण अबू यांना कुरापत काढण्यासाठी काहीतरी निमित्तच हवे होते. भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आपल्याला हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेचा दर्जा असलेल्या भाषेतून शपथ घेता येऊ शकते, असे त्यांनी सांगितल्याचे जाहीर झाले आहे. अरे वा रे वा, हे म्हणजे अबू यांच्या उलट्या बोंबा आहेत. म्हणजे सोयीचे असेल तेव्हा भारतीय राज्यघटना तोंडी लावायला यांना असते काय, नुकताच काही धर्मांध मुस्लीम इमामांमी वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही, आमच्या ते धर्माविरुद्ध आहे, मुस्लीमांना ते म्हणू नये, असा फतवा काढला होता. तेव्हा त्याचा थेट निषेध करण्यासाठी अबू यांचे तोंड शिवले होते का, त्यांनी तातडीने त्या फतव्याचा निषेध का केला नाही, काही वर्षांपूर्वी शाहबानो खटल्यात तेव्हांचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवला तेव्हा, पाकिस्तान जिंकल्यानंतर भारतात फटाके वाजविणारे काही धर्मांध मुसलमान, ज्या मशिदीत गेली अनेक वर्षे कोणी नमाज पढत नव्हते आणि भारतावर वेळोवेळी आक्रमण करणारा बाबर याच्या नावाने ओळखली जाणारी मशिद पाडली गेली म्हणून देशभरात दंगली घडविणारे, भिवंडीत पोलीस ठाणे बांधायला विरोध करुन पोलिसांना जिवंत मारण्याची झालेली गुंडगिरी, काश्मिरमध्ये जाळण्यात आलेला भारताचा राष्ट्रध्वज, मुंबईत झालेली बॉम्बस्फोट मालिका, गेल्या वर्षी झालेला २६/११चा दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला या आणि अशा अनेक घटनांबाबत अबू आणि तथाकथित मुस्लीम नेते, त्या समाजातील सेलिब्रेटी गप्प का बसतात, अशा अशा वेळी त्यांना भारतीय राज्यघटना, राष्ट्र, राष्ट्रध्वज, देशाचे मानबिंदू यांची का आठवण होत नाही. वंदेमातरम हे राष्ट्रगीत नाही, तर ते राष्ट्रीय गीत आहे, असे वंदेमातरमला विरोध करणाऱयांकडून सांगितले जाते. खरे तर अशा घटना घडल्यानंतर केंद्रशासन व देशातीव विविध राज्य शासनांनी कठोरपणे राष्ट्रद्रोह करणाऱया व्यक्तींना अटक करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. आपल्याकडे संसदेवर हल्ला करणाऱया अपझल गुरुला फाशी द्यायची की नाही त्यावरुन तसेच समान नागरी कायदा लागू करण्यावरुनही मुठभर मुसलमानांचा विरोध. का तर ते शरियतला मान्य नाही. मग प्रश्न असा उपिस्थत होतो की तुम्हाला हे मान्य नाही, तुम्हा शरियतच जर प्रमाण मानायचे असेल तर भारतात का राहता, भारतात राहून सर्व फायदे का उकळता, फौजदारी गुन्ह्यांबाबत तुम्हाला भारतीय दंड विधानानुसार का शिक्षा द्यायची, असे प्रश्न हिंदुत्ववाद्यांनी उपिस्थत केले तर त्यात काय चुकीचे आहे. मुसलमान गुन्हेगार असेल तर त्याला शरियतनुसार हात तोडणे, डोळे फोडणे अशीच शिक्षा करायला पाहिजे. त्याला तुमची तयारी आहे का म्हणजे आपल्याला सोयीचे असेल तिथे भारतीय राज्य घटनेचा आधार घ्यायचा आणि सोयीचे नसेल तेव्हा तिला धाब्यावर बसवायचे, असे सुरु आहे. अबू आझमी यांच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा समोर आले आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत की नाही.

5 comments:

  1. एकदम बरोबर आहे.....साला एकदम हरामखोर माणूस आहे तोः...आणि अश्या माणसाला हेच योग्य आहे....
    मला मनापासून आनंद झाला आहे कि कुणीतरी आहे ज्याचा वचक आता राहील..
    तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवुन न्याय मिळवा,पण न्याय हा झालाच पाहिजे......

    ReplyDelete
  2. जय आणि हरेकृष्णजी
    नमस्कार
    आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार.
    शेखर

    ReplyDelete
  3. वचक बसलाच पाहीजे आणि म्हणुनच मनसे आणि पर्यायाने राज ठाकरेंशिवाय पर्याय नाही असे मला तरी वाटते.

    ReplyDelete