13 November 2009

२९ वर्षात झाली ५१ वादळे

लैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना या नावाने ओळखण्यात येणार आहे. भारतासह बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी देशांनी समुद्री वादळांची ही संभाव्य नावे तयार केली आहेत. मुंबईला धडक देण्याची शक्यता असलेल्या चक्रीवादळाचे ‘फयान’ हे नाव म्यानमार या देशाने दिलेले होते. अशा साठहून अधिक नावांची यादी तयार करण्यात आली आहे. भारताच्या विविध राज्यांना तडाखा देणारी ही वादळे नेहमीच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होत असतात. ‘फयान’च्या पूर्वी आत्तापर्यंत १९७० ते १९९९ या कालावधीत दोन्ही महासागरात ५१ चक्रीवादळे येऊन गेली आहेत. बंगालच्या उपसागरात सगळ्यात पहिले चक्रीवादळ ७ ते १४ जुलै १९७१ या काळात तयार झाले होते. ओरिसाचा दक्षिण किनारा व आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनाऱ्यावर तयार झालेले हे वादळ पुढे दिल्लीपर्यंत सरकले होते. याचा फटका ओरीसामधील पुरी, कटक इत्यादी ठिकाणी बसला होता. पुढे त्याच वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीतही चक्रीवादळाचा फटका भारताला बसला होता. १९७२ मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत चक्रीवादळे तयार झाली असल्याची माहिती मिळते. १९७० ते १९९९ या कालावधीत बंगालच्या उपसागरात प्रश्नमुख्याने सप्टेंबर ते डिसेंबर या काळात तयार झाली होती. तर १९७९ मध्ये १० ते १३ मे या कालावधीतही आंध्र प्रदेश जवळ वादळ तयार झाले होते. अरबी समुद्रात १९९९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत ११ चक्रीवादळे तयार झाली आहेत. त्याची सुरुवात १९७५ मध्ये झाली. १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत या वादळाचा फटका सौराष्ट्र, जामनगर, राजकोट इत्यादी ठिकाणांना बसला. अरबी समुद्रात तयार झालेली ही वादळे मे, जून, ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीतील आहेत. या वादळांचा फटका प्रामुख्याने गुजरात राज्यालाच बसला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळांचा भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. दरम्यान बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या या वादळांना नाव देण्याचा ठराव २००० मध्ये मंजूर करण्यात आला. मस्कत येथे झालेल्या बैठकीस बांगलादेश, भारत, मालदिव, म्याननार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड इत्यादी देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक देशाने सुचवलेले नाव अक्षर वर्णमालेनुसार लिहिण्यात आले आहे. सध्या ६० हून अधिक नावांची यादी तयार करण्यात आली असून आगामी काळात येणाऱ्या वादळाचे नाव ‘वरद/वरध’ असे ठेवण्यात आले आहे. जगभरातील सात ‘रिजनल स्पेशलइज्ड मिटिओरोलॉजिकल सेंटर (आरएसएमसी) त्या-त्या प्रदेशात येणाऱ्या वादळांचे बारसे करत असतात. आपल्याकडे या आठ देशांनी सुचवलेल्या नावांच्या यादीत हेलन, चपला, फोनी, जल, लहेर, मेघ, सागर, वायू, लैला, नीलम, मराजन, कयान, महा, लुबान, बुलबुल, सोबा, प्रिया, महा, मोहरर, निलोफर, आदी चित्रविचित्र नावांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment