07 November 2009

घरबसल्या मिळवा मायबोलीतील पुस्तके

मराठी पुस्तक प्रकाशन आणि विक्री व्यवसायातही आता मार्केटिंगचे नवे फंडे अवलंबिण्यात येत असून त्यामुळे मराठी पुस्तक विक्री आणि प्रकाशन व्यवसायालाही मोठी मदत होत आहे. पुस्तके घेण्यासाठी वाचक जर पुस्तकांच्या दुकानात येत नसेल तर पुस्तकेच थेट त्याला घरबसल्या मिळावी, या उद्देशाने ‘मायबोली’ या संकेतस्थळाने ऑनलाईन पुस्तक खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आत्तापर्यंत ही सुविधा परदेशस्थ भारतीयांसाठीच उपलब्ध होती ती आता भारतातील तमाम मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांनाही उपलब्ध झाली आहे.‘मायबोली’च्या http://kharedi.maayboli.com या संकेतस्थळावर ही सोय आहे. या ऑनलाईन खरेदीमुळे मराठी वाचकांना आता घरबसल्या आपली आवडती पुस्तके कुरिअरद्वारा मिळू शकतील तसेच भारतात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांनाही ते भेट म्हणून ही पुस्तके ‘मायबोली’द्वारे पाठवू शकतील. मराठीतील अनेक मान्यवर प्रकाशकांची पुस्तके या ऑनलाईन खरेदीत संकेतस्थळावर पाहायला मिळू शकतात. पुस्तकाचा लेखक, पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि पुस्तकाची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. पुस्तकांच्या किमती सध्या ‘युएसडी’ मध्ये देण्यात आल्या असून लवकरच त्या भारतीय चलनातही देण्यात येणार आहेत.मायबोलीच्या ‘खरेदी’ या विभागात आरोग्य, समाज, कविता, संगीत, पर्यटन आणि अन्य विषयावरील विविध पुस्तके उपलब्ध आहोत. ‘संगीत’ विभागात गंधर्वगाथा (भा. द. खेर), माझे संगीत (केशवराव भोळे), नादवेध (सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले), स्वरार्थरमणी (किशोरी आमोणकर) तर ‘पर्यटन’ या विभागात मीना प्रभू यांची चिनीमाती, मेक्सिकोपर्व, तुर्कनामा, ग्रीकांजली तसेच अनिल अवचट यांचे ‘अमेरिका’, मिलिंद गुणाजी यांचे ‘भटकंती’ आदी पुस्तके वाचकांना पाहायला मिळू शकतात. भाऊसाहेब पाटणकर (दोस्त हो), सुरेश भट (एल्गार) आणि अन्य कवितासंग्रह व अन्य विषयांवरील अनेक पुस्तके आहेत. गेल्या काही वर्षापासून मराठी तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट सर्फिगची आवड मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. ‘मायबोली’प्रमाणेच इतरही काही संकेतस्थळांकडून ऑनलाईन मराठी पुस्तक खरेदीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नेटसॅव्ही असलेल्या या तरुणांना डोळ्यासमोर ठेवून मराठी पुस्तकांच्या विक्रीसाठी असे नवे मार्ग चोखाळले जात आहेत.

5 comments:

  1. काय शेखर? खुप दिवसानंतर पोस्ट?? कुठे गायब झाले होते?

    ReplyDelete
  2. अरे वा, पहिली प्रतिक्रिया आपली मिळावी, खूप छान वाटले. अहो काही तांत्रिक कारणामुळे मला माझा जोशीपुराण हा ब्लॉग बंद करावा लागला. त्यावर मला नवे लेखन करता येत नव्हते. आता मी पुन्हा एकदा जोशी पुराण हा नवा ब्लॉग सुरु केला आहे. पूर्वीसारखे नियमित लेखन कराचये म्हणतोय.
    बाकी काय म्हणताय
    शेखर

    ReplyDelete
  3. .कांही विशेष नाही. बस.. रुटीन सुरु आहे. तुमच्या जुन्या ब्लॉग वर पण एक कॉमेंट टाकली होती मध्यंतरी.. माझा तोच ब्लॉग सुरु आहे.अद्याप तरी नियमित लेखन सुरु आहे.:)

    ReplyDelete
  4. ऑनलाईन पुस्तक खरेदी
    I had made my purchase on My hangout store.
    The site is fraud.
    The site deceive me & stolen my money.
    I lost 175/- INR.
    So I advise everyone do no purchse online marathi book from my hangout store.

    ReplyDelete