नटरंग या चित्रपटातील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा हे गाणे अमाप लोकप्रिय झाले आहे. कोणत्याही कायर्क्रमात, उत्सवात हे गाणे वाजवले जाते. अशा या लोकप्रिय गाण्यावर माझी दहा वर्षांची मुलगी मानसीने हे विडंबन गीत केले आहे.
वर्गात अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर ऑफ पिरियडला खाली खेळायला सोडा हे सांगण्यासाठी आता वाजले की बारा या गाण्याच्या चालीवर आधारित हे गाणे मानसीने तयार केले आहे.
आज आहे आमचा मूड, खूप चांगला दिवस
आम्हा सोडा ना हो खाली आम्हा चैन पडेना
एवढा वेळ आम्ही पाहिली वाट,
नाही बोलत हो आम्ही खोटं
खेळायचं आहे हो खूप आम्हाला
आता सोडाना ना हो खाली...
राखली की मर्जी तुमची अभ्यास आम्ही केला
आता तरी अभ्यासातून मुक्त आम्हा करा
मऱाठीचा अभ्यास झाला झाली गणितंही सोडवून
इतिहास आणि भूगोल तुमचा झालाय शिकवून
आम्हा सोडा खेळायला मस्ती नाही करणार
ऊनं आलं डोक्यावरती तरी चक्कर नाही येणार
बाई, चक्कर नाही हो येणार
पाहिजे तर राखणीला तुम्ही येऊ शकता
आम्ही कसं खेळतो ते तुम्ही बघू शकता
आता कसं सांगू कळत नाही, दुसरं काही सूचत नाही
आम्हा सोडा ना हो प्लीज खाली...
आता सोडाना हो आम्हा खाली
वेळ आहे खूप कमी
वीसचं मिनिंटं आता उरली
आम्हा सोडा ना हो खाली
आता वाजले की बारा...
असं काय करता, वर्गात ठेवता, अभ्यास देता
बोल बोल बोलतां, कटकट असते तुमची हो
पहिला तास गेला आता, सहावा तास गेला
आता नवव्या तासाला तरी सोडा
आम्हा सोडा ना हो खाली
आता वाजले की बारा...
-मानसी जोशी
Aaila...Bharriii...!!! :) mastach...
ReplyDeleteएकदम मस्त.. !! मानसी, अभिनंदन...
ReplyDeleteमैथीली, हेरंब,
ReplyDeleteनमस्कार
मानसीच्या कौतुकाबद्दल धन्यवाद.