प्रभात चित्र मंडळाच्या वास्तव रुपवाणी या मासिकाचा जून महिन्याचा अंक नुकताच वाचनात आला. प्रभात चित्र मंडळाचे संस्थापक आणि विश्वस्त तसेच फिल्म सोसायटीचे चळवळीचे प्रवर्तक सुधीर नांदगावकर यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्तृत्व गौरव सोहळा अंक म्हणून प्रकाशित करण्यात आला आहे. श्रीकांत बोजेवार आणि संतोष पाठारे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.
आपल्या संपादकीयात बोजेवार व पाठारे यांनी म्हटले आहे की, मुंबईत १९६८ पूर्वी अनेक फिल्म सोसायट्या कायर्रत होत्या. मात्र मराठी माणसांची फिल्म सोसायटी असावी या कल्पनेने नांदगावकरांना झपाटून टाकले. आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठा मध्ये काम करत असताना त्यांनी अनेक चित्रपटांची समीक्षा केली होती. पण जागतिक दर्जाचे चित्रपट मराठी रसिकांना बघायला मिळत नाहीत ही खंत त्यांच्या मनात होती. म्ङणून प्रभात चित्र मंडळाची १९६८ मध्ये नांदगावकर यांनी स्थापना केली. तेव्हापासून प्रभात व नांदगावकर असे समीकरणच बनून गेले आहे.
नांदगावकरांचे कार्य शब्दात मावणारे नाही. पण त्यांच्या कर्तृत्वाची दखल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणून नांदगावकरांसोबत फिल्म सोसायटी चळवळीत सहभागी असणाऱयां त्यांच्या सहकाऱयांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वास्तव रुपवाणीचा हा विशेष अंक.
या अंकात दिनकर गांगल (नांदगावकरची दुहेरी निष्ठा), विजया चौहान (सुधीर-एक लोभस व्यक्तिमत्व), सतीश जकातदार (प्रेक्षक चळवळीचा मिशनरी), दत्तात्रय जोशी (ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी), रघुवीर कुल (सत्तरी नव्हे अत्तरी), श्रीकांत बोजेवार (चतुरस्त्र), संतोष पाठारे (प्रभातचा वारसा), अभिजित देशपांचे (झपाटलेला) आणि वसंत सोपारकर यांची कविता असे साहित्य अंकात आहे. अंकात नांदगावकर यांची काही जुनी छायाचित्रेही आहेत.
वास्तव रुपवाणी मासिक गेली सतरा वर्षे सुरू असून अंकाचे मूल्य दहा रुपये इतके आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
वास्तव रुपवाणी, द्वारा प्रभात चित्र मंडळ,
शारदा चित्रपटगृहाशेजारी, दादर (पूर्व)
मुंबई-४०००१४
टेलीफॅक्स ०२२-२४१३१९१८
ई-मेल cinesudhir@gmail.com
No comments:
Post a Comment