जगात औषधांचा वापर आणि वैद्यक विश्वाचा जन्म कधी झाला, जगातला सर्वात प्रथम डॉक्टर कोण किंवा कोणते वैद्यक शास्त्र प्रथम अस्तित्वात आले, असे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात. सगळ्यानाच त्याची उत्तरे माहिती असतातच असे नाही. पण आता आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे याविषयीची माहिती देणारे अनोखे संग्रहालय उभे राहिले आहे.
नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात हे संग्रहालय उभे राहिले आहे. आदिती वैद्य आणि तिच्या सहकाऱयांनी हे संग्रहालय उभारले आहे.
या विषयी सविस्तर माहिती देणारी प्रसाद मोकाशी यांची बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २९ जून २०१० च्या अंकात पान क्रमांक एक वर प्रसिद्ध झाली आहे. या बातमीची लिंक पुढीलप्रमाणे...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=81391:2010-06-28-15-04-31&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81
या संग्रहलयाला केवळ वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही भेट दिली पाहिजे. आजवरच्या वैद्यकशास्त्राचा इतिहास या संग्रहालयाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडला गेला आहे.
No comments:
Post a Comment