17 December 2009

चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलन

महर्षी शांडिल्य प्रतिष्ठान आणि सोलापूर येथील जोशी कुलबंधु व भगिनी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ व २७ डिसेंबर रोजी सोलापूर येथे २९ वे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रकाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. सध्याच्या काळात अशी ज्ञाती संमेलने आयोजित करावी का, असा वादाचा मुद्दा उपिस्थत होऊ शकतो. मात्र मला असे वाटते की अशी ज्ञाती संमेलने भरविण्यात काहीही चूक नाही. वेगवेगळ्या प्रांतात आणि राज्यातील विविध शहरात पसरलेले कुलबंधु या निमित्ताने दोन दिवस एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते, परस्परांच्या ओळखी होतात, यातून काही नवीन उपक्रम हाती घेतले जाऊ शकतात.  सर्वात महत्वाचे म्हणजे दूरचित्रवाहिन्या, इंटरनेट आणि परस्परांमधील संवाद कमी होत जाण्याच्या काळात अशा संमेलनाच्या निमित्ताने अनोळखी व्यक्तीनी एकत्र येऊन नवीन ओळखी वाढवणे आणि सवंदा साधणे हे काम या संमेलनांच्या निमित्ताने होत असते. त्यामुळे अशी विविध ज्ञाती संमेलने होणे गरजेचे आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनाची सुरुवात १९८२ मध्ये झाली आणि आजतागायत गेली २८ वर्षे ही संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. संमेलनाला ज्ञाती बांधवांची उपिस्थतीही  मोठ्या प्रमाणात असते हे विशेष. ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन २८ मार्च १९९२ मध्ये पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर पुणे, रत्नागिरी, इचलकरंजी, बडोदा, डोंबिवली, नाशिक, कोळथरे (जिल्हा-रत्नागिरी, तालुका-दापोली), ठाणे, चिपळूण, मुंबई, वरवडे विलेपार्ले, अकोला, लोणावळा, नागपूर, सातारा आदी विविध ठिकाणी ही संमेलने झाली आहेत. यंदाचे २९ वे संमेलन सोलापूर येथे होणार आहे.


सोलापूर येथील गजानन कृष्णाजी जोशी व अतुल वसंत जोशी हे संमेलनाचे प्रमुख संयोजक आहेत. उपलम मंगल कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे हे संमेलन होणार आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून संमेलनार्थींचे स्वागत आणि नावनोंदणी सुरु होणार आहे. संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि नऊनंतर भोजन असा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आहे. दुसऱया दिवशी सकाळी (२७ डिसेंबर) सकाळी ७ ते ९ या वेळेत कुलदैवतपूजन, आरती मंत्रपुष्प व तीर्थप्रसाद सकाळी ९ ते १० या वाळेत अल्पोपहार, १० ते १२.३० या वेळेत मुख्य समारंभ आणि दुपारी साडेबारानंतर भोजन झाल्यावर  संमेलनाची सांगता  होणार आहे. संमेलनाची वर्गणी प्रत्येकी २०० रुपये असून ती संमेलनस्थळीच स्वीकारण्यात येणार आहे. शनिवार २६ डिसेंबरची संध्याकाळ ते रविवार २७ डिसेंबर पर्यंतचा संमेलन समारोप होईपर्यंत संमेलनार्थींच्या निवास व भोजनाची सोय स्थानिक संमेलन समितीकडून केली जाणार आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमलेनात जास्तीत जास्त कुलबंधु आणि भगिनी तसेच माहेरवाशीणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आमडेकर, उत्तुरकर, घनवटकर, घुले, घोरपडे, जोशीराव, टकले, टोकेकर, दणगे, दाणेकर, गुदल, नामजोशी, फडणीस, बावडेकर, भाटे, मटंगे, मनोळीकर, मेडदकर, मोकाशी, योगी, राजवाडे, वाडेकर, शेंडे, हरिश्चंद्रकर, हुपरीकर, ही आडनावे असणारे सर्वजण मूळचे चित्पावन शांडिल्य गोत्र जोशीच आहेत. विविध कारणांनी त्यांच्या पूर्वजानी वरील आडनावे स्वीकारलेली आहेत. या सर्व आडनावांचा समावेश १९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी  या कुलवृत्तान्तात करण्यात आला आहे. आपल्या परिचयातील अशा कुलबांधवानाही ही माहिती सांगून त्यानाही सोलापूर येथील संमेलनास येण्यास सांगावे, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.


चित्पावन शांडिल्य गोत्र  जोशी यांचे श्री लक्ष्मी केशव, कोळिसरे, जिल्हा रत्नागिरी आणि श्री लक्ष्मी नृसिंह, कसबा-संगमेश्वर, जिल्हा-रत्नागिरी ही कुलदैवत आहेत. काहींचे लक्ष्मीकेशव तर काहींचे लक्ष्मीनृसिंह असे कुलदैवत आहे. लक्ष्मीकेशव, कोळीसरे येथे भार्गव मराठे हे मंदिराचे पुजारी आहेत. त्यांचा दूरध्वनी असा ०२३५७-२४३८३५ तर लक्ष्मीनृसिंह येथे जाण्यासाठी संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे बापू जोशी ०२३५४-२५२९६० किंवा केशव जोशी ०२३५४-२५२४४६


सोलापूर येथील २९ व्या चित्पावन शांडिल्य गोत्र जोशी संमेलनासाठी ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांच्यासाठी अधिक माहितीकरता संपर्क दूरध्वनी पुढीलप्रमाणे
गजानन कृष्णाजी जोशी-०९९७५२५८२६०

संमेलनाला उपिस्थत राहणाऱयांनी आपली नावे आणि वय लेखी स्वरुपात डॉ. पी. के. जोशी, चर्च स्ट्रीट, शांतिसागर मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर येथे कळवावीत.       

1 comment:

  1. सगळ्या वरवडेकर जोशी यांना हा प्रश्न आहे. म्हणजे ज्यांचे मूळ गाव वरवडे आहे त्यांना.

    श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे) यांच्यावरील एका पुस्तकात पेशव्यांची सगळ्यात लहान मुलगी अनुबाई म्हणजे चिमाजी अप्पांची धाकटी बहीण हिचे सासुरवाड घोरपडे हे मूळचे जोशी. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्यातले वरवडे.

    आता "जोशी उदंड जाहले" हे ही खरेच. पण हे वाचल्यापासून एक उत्सुकता लागून राहिली आहे की आपण याच जोशांच्या एखाद्या शाखेतले/उपशाखेतले तर नव्हे?

    कुणाकडच्या जुन्या मोडीतील कागदपत्रात असा काही उल्लेख आहे का? किंवा घरातील वडीलधार्यांना तुम्ही असे काही बोलताना ऐकले आहे का? काही माहिती असेल तर कृपया सांगावे.

    ReplyDelete