13 December 2009

द्वारकेत भागवत सप्ताह...

हिंदू धर्मामध्ये चार वेद आणि अठरा पुराणांना खूप महत्व आहे. जी अठरा पुराण आहेत, त्यात भागवत या पुराणाचा समावेश होतो. भागवत आणि भगवदगीता यांचा काहीही संबंध नाही. भगवदगीता म्हणजे कृष्णाने अर्जूनाला केलेला उपदेश आहे. तर भागवतपुराणाचा मुख्य विषय भक्तीयोग हा आहे. महर्षी व्यास यांनी रचलेल्या या भागवतपुराणात भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी सांगण्यात आले आहे. भागवतपुराणातील कृष्णकथा, कृष्णनिती आणि कृष्णविचारांचा प्रचार होण्यासाठी विविध ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते. भागवत पुराण हे बारा भागांमध्ये
पहिल्या भागात विष्णूच्या सर्व अवतारांविषयी माहिती देण्यात आली आहे. भागवतपुराणात एकूण १८ हजार श्लोक आहेत.


वैष्णव पंथीयांसाठी भागवतपुराण हा ग्रंथ महत्वाचा मानण्यात येतो. वेद आणि उपनिषदे यांचे सार या पुराणात सांगण्यात आले आहे. सकाम कर्म, निष्काम कर्म, ज्ञान साधना, सिद्धि साधना, भक्ति, अनुग्रह,  द्वैत-अद्वैत, द्वैताद्वैत, निर्गुण-सगुण  आदींबाबत यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात आणि भारतात विविध ठिकाणी भागवतपुराणाचे कायर्क्रम आयोजित करण्यात येत असतात. त्यालाच भागवत सप्ताह म्हणून ओळखले जाते.


गेल्या काही वर्षांपासून विवेक घळसासी हे नाव मराठी लोकांना वक्ता, प्रवचनकार आणि भागवतपुराण निरुपणकार म्हणून परिचित झाले आहे. घळसासी यांनी काही वर्षे तरुण भारत या दैनिकाचे मुख्य संपादक म्हणूनही काम पाहिले आहे.  डोंबिवलीतील स्मिता केसकर, सुखदा वेलणकर यांनी पुढील वर्षी एप्रिल महिन्यात घळसासी यांच्या भागवत सप्ताहाचे आयोजन केले आहे हा कार्यक्रम द्वारका येथे होणार आहे. घळसासी यांचा भागवत सप्ताह यापूर्वी नुकताच द्वारका येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे पुढील वर्षी येणाऱया अधिक मासाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


दर तीन वर्षांनी अधिक महिना येत असतो. या अधिक महिन्यांत विविध व्रतवैकल्ये केली जातात. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन कीर्तन, प्रवचन श्रवण करणे, तीर्थयात्रा करणे आदी केले जाते. पुढील वर्षी १५ ते २१  एप्रिल या कालावधीत द्वारका येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ११ एप्रिल २०१० रोजी मुंबई सेंट्रलहून पोरबंदरकडे प्रयाण करायचे असून सुदामनगरी, किर्तीमंदिर, सोमनाथ, सोमनाथशहर दर्शन केले जाणार आहे. १४ तारखेला संध्याकाळी द्वारकेत आगमन होणार असून १५ तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून भागवत कथा/सप्ताहास सुरुवात होणार आहे. २१ एप्रिल रोजी भागवत सप्ताहाची समाप्ती होणार असून दुसऱया दिवशी दुपारी एक वाजता परतीच्या प्रवासाला निघायचे आहे.


घळसासी यांच्या भागवत सप्ताहात सामाजिक व राजकीय सद्यस्थिती,  त्या परिस्थितीला अनुरुप ठरणारे भगवान श्रीकृष्ण यांचे विचार, कृष्णनिती यांचा उहापोह केला जातो. गेल्या काही वर्षात ठिकठिकाणी घळसासी यांचे भागवत सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र खुद्द द्वारकेमध्ये आयोजित या भागवत सप्ताहाला विशेष असे महत्व आहे.



या संदर्भात अधिक माहिती आणि ज्यांना या भागवत सप्ताहासाठी जाण्याची इच्छा आहे, त्यांनी स्मिता केसकर  यांच्याशी ९९२०८५८८१४/०२५१-२४८८९८० किंवा सुखदा वेलणकर यांच्याशी ९९२०६५९३७९/०२५१-२४८०५०३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.             

5 comments:

  1. नमस्कार,
    मी मस्कत ला राहते. मला नेट वर भागवत प्रवचन उपलब्ध आहे का? किंवा त्यांचे व्हीडीओ यु ट्यूब वर मिळतील का? जरा अवघड आहे. नाहीतर मला इमेल वर पाठवू शकाल का?
    मला एकदा तरी भागवत सप्ताह अनुभव घ्यायचा आहे, आवड ही आहे. कसे करता येईल काही मार्गदर्शन कराल का?

    ReplyDelete
  2. अनुश्री
    नमस्कार
    नेटवर भागवत प्रवचन उपलब्ध आहे का, त्याची मलाही माहिती नाही. भागवत सप्ताहाबाबत एखादा व्हिडिओ असेल किंवा त्याची सीडी जर मला मिळू शकली तर मी मेल करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला मस्कतहून एप्रिल महिन्यातील भागवत सप्ताहाला येणे शक्य असेल तर जरुर यावे. द्वारकेत भागवत सप्ताह आयोजित करणाऱया स्मिता केसकर यांच्याशी आपण बोलून घ्या. गेल्या वेळी झालेल्या भागवत सप्ताहाची व्हीसीडी त्यांच्याकडे असेल तर ती मेल करण्याची त्यांना विनंती करा. मी ही त्यांच्याशी बोलून घेईन.
    आपण अगत्याने प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
    शेखर जोशी

    ReplyDelete
  3. अनुश्री,
    नमस्कार
    आत्ताच मला नेटवर भागवत सप्ताहाचा व्हिडिओ मिळाला. तो हिंदीत आहे. त्याची लिंक खाली देत आहे.गुगलवर भागवत सप्ताह असा सर्च दिला तर तुम्हाला भागवत सप्ताहाचे व्हिडिओ मिळू शकतील.
    http://www.bollywoodsargam.com/video_todayfeaturedvideo.php?blockbustermovieclip=h-faQzdYZMA----Bhagavat_Saptah_(Srimad_Bhagavatam)_Katha_Narad_Vyas_Samvad_Gujarati_Samaj_Juhu_Mumbai_featured_hollywood_blockbuster_video.html

    कळावे,
    शेखर जोशी

    ReplyDelete
  4. घळसासी यांच्या प्रवचनातच नव्हे तर भागवत वा इतर पुराणावरील प्रवचनात उपनिषदात साक्षात्कार या स्वरूपात जे ज्ञान सांगितले आहे तेच अनुभवाने प्रत्ययाला आलेले ज्ञान म्हणून पुराणानी वर्णन केले आहे या बाबीवर भर दिला जात नाही.

    ReplyDelete
  5. Shri Shekhar Joshi : Your statement that 'the adhik maas occurs once every 3 years' is not correct; it is more like four times every 11 years, loosely following a 3-3-2 or 3-3-3-2 pattern. Over last 50 years, the adhik occurred (usually around June) of the following gregorian years (subtract 78 to get the Shalivahan index) : 1961 (shake 1883), 1963, 1966, 1969, 1972, 1974, 1977, 1979-or-80 (my memory is failing me, but logic suggests it should be 1980), 1982, 1985, 1988, 1991, 1993, 1996, 1999, 2001, 2004, 2007, 2010.

    During every Hindu month the sun passes from one celestial configuration (AA) to another (BB); thus a month can be associated with two such configurations, AA and BB. When the sun stays in the same configuration for the whole month, it is deemed adhik. When it passes through three configurations in a month of (say) Chaitra, the next month (Vaishakh) disappears completely and the calendra jumps to Jyeshhtha. The only time this has happened during my lifetime was in Shake 1904 (March 1982 - April 1983) which saw elision of one month, but it had two Purushottam (adhik) months. There was a nice article on the science of it in SakaaL around 1995.

    - dn

    ReplyDelete