12 November 2009

चक्रीवादळाचा झंजावात

मुंबईच्या किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता असलेले फयान हे चक्रीवादळ मुंबईला हुलकावणी देऊन गुजरातकडे निघून गेले असले तरी या चक्रीवदाळाने कोकणाला आपला तडाखा दिला. चक्रीवादळ निर्माण होणे आणि त्याला नाव देणे हे शास्त्रज्ञांसाठी आता नेहमीचेच झाले आहे. या चक्रीवादळांना देण्यात येणारी चित्रविचित्र नावे वाचून सर्वसामान्यांना मोठी गंमत वाटते. काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात एला हे चक्रीवादळ तयार झाले आणि त्याने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाला जबरदस्त तडाखा दिला. ही वादळे कशी तयार होतात, त्यांना ही नावे कशी देण्यात येतात, असे प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. त्याविषयी आजच्या जोशीपुराणावर... ही वादळे भारताप्रमाणेच मुख्यत: उष्ण हवामानाच्या प्रदेशातच ( विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना) तयार होतात. या प्रदेशातील उष्णतेमुळे समुद्रावर हवेचा कमी दाब निर्माण होतो आणि मग इतर ठिकाणची हवा कमी दाबाच्या दिशेने वाहते. पृथ्वी स्वत:भोवती फिरत असल्याचा परिणाम म्हणून ही बाहेरून येणारी हवा थेट कमी दाबाच्या क्षेत्रात प्रवेश करीत नाही, तर ती त्याच्या भोवती फिरत राहाते. त्यातूनच चक्रीवादळाचा जन्म होतो. बाष्प मिळत जाईल तसे ते अधिक तीव्र होत जाते आणि किनाऱ्याकडे येऊन विध्वंस घडवते. त्याच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान विशिष्ट टप्प्यापर्यंत वाढावे लागते. म्हणूनच तर चक्रीवादळांची निर्मिती पृथ्वीवर विशिष्ट पट्टय़ातच होते, असे लोकसत्ता दैनिकात ३० मे २००९ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या चक्रीवादळाच्या अंतरंगात या अग्रलेखात म्हटले आहे. भारतीय उपखंडात ती ‘सायक्लॉन’ म्हणून ओळखली जातात. अमेरिका, मेक्सिको, कॅरिबियन बेटांच्या परिसरात उद्भवणारी ‘हरिकेन’; जपान, तैवान, चीन, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया या भागातील ‘टायफून’, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या परिसरातील ‘विली-विली’ हीसुद्धा हवामानाच्या दृष्टीने आपल्या चक्रीवादळांचीच भावंडे! त्यामुळेच अमेरिकेत २००५ साली विध्वंस करणारी ‘कॅटरिना’, ‘रीटा’, ‘डेनिस’ ही वादळे किंवा चीन-तैवान-इंडोनेशियामध्ये धडकणारी ‘डय़ुरियन’सारखी वादळे आणि भारतीय उपखंडातील चक्रीवादळे यांच्यात निर्मितीच्या दृष्टीने फरक करता येत नाही. या वादळांची निर्मिती लाखो-कोटय़वधी वर्षांपासून सुरु अहे. केवळ भारतच नव्हे तर उपखंडातील आठ देश एकत्र येऊन वादळांचा वेध घेऊ लागले आहेत. (म्हणूनच वादळांना या वेगवेगळय़ा देशांची ‘एला’, ‘गोनू’, ‘ओग्नि’, ‘सिद्र’, ‘मूरजान’ अशी चित्रविचित्र नावे दिली जात आहेत.) असल्याचीही माहिती या अग्रलेखात आहे. याच संदर्भात १२ नोव्हेंबर २००९ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यात म्हटले आहे की, वादळ किनाऱयावर धडकल्यानंतर त्याला त्या त्या ठिकाणचे नाव देण्याची प्रथा पूर्वी होती. वादळाला आधीच नाव दिल्याने स्थानिक आणि आंतराष्ट्रीय पातळीवर ते ओळखण्यास मदत होते. एकाच ठिकाणी दोन वादळे निर्माण झाली तरी त्यात गोंधळ होत नाही. जगभरात सात रिजनल स्पेशलाइज्ड मिटिओरोलॉजिकल सेंटर त्यांच्या प्रदेशात येणाऱया वादळांना नावे देतात. बंगालचा उफसागर व अरवी समुद्रात तयार होणाऱया वादळांना नाव देण्याचा ठराव २००० मध्ये मस्कत येथे झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. त्या बैठकीस बांगलादेश, भारत, मालदिव, म्यामनार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका व थायलंड या देशांचे प्रतिनिधी हज होते. प्रत्येक देशाने सुचवलेली नावे अक्षरमालेच्या क्रमानुसार लिहिण्यात आली आहेत. सध्या अशा ६४ नावांची यादी तयार आहे. आता भविष्यात वादळ झाल्यास त्याला ओमान जेशाने सुचवलेले वरद हे नाव देण्यात येणार आहे. व त्यानंत तयार होणाऱया वादळाला पाकिस्तानने सुचवलेले लैला हे नाव देण्यात येणार आहे. इच्छुकांना लोकसत्ताचा हा अग्रलेख http://www.loksatta.com/old/daily/20090530/edt.htm या लिंकवर वाचता येऊ शकेल

No comments:

Post a Comment