19 November 2009

शिवप्रताप दिन

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या प्रतापगड येथे झालेल्या भेटीच्या वेळेस अफजलखान याने दगाफटका करुन शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. महाराष्ट्रावर चालून आलेल्या अफजलखानरुपी राक्षसाचा शिवाजी महाराजांनी वध केला. हा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी. इंग्रजी कालगणनेनुसार येत्या २४ नोव्हेंबर रोजी हा दिवस येत असून यंदाच्या वर्षी या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वाई येथील प्रतापगड उत्सव समितीने वाई येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.



प्रतापगडाच्या युद्धात शिवाजी महाराज यांनी विजय संपादन करुन आणि अफजलखानाचा वध करुन बलाढ्य शत्रूला नेस्तनाबूत करण्याचा इतिहास घडवला. शिवाजी महाराज यांचे हे धाडस, चातुर्य, राजकारण, त्यांच्या मावळ्यांची कामगिरी हा सर्व इतिहास प्रत्येकालाच अभिमान वाटावा असा व प्रेरणादायी आहे. या दिवसाची आठवण म्हणून प्रतापगड उत्सव समितीने पंधरा वर्षांपूर्वी प्रतापगडाच्या परिसरात हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. अफजलखान वधाच्या ऐतिहासिक घटनेला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे समितीने ठरवले आहे.


शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या प्रतापगडाच्या युद्धाचा दाखला जागतिक युद्धशास्त्रातही अभ्यासासाठी देण्यात येतो. आपण मात्र पाहिजे तितके या प्रकरणाकडे पाहात नाही. अफजलखान वध ही ऐतिहासिक सत्य घटना असली तरी त्याचा देखावा लावण्यास परवानगी न मिळणे, पाठ्यपुस्तकातून हा धडा किंवा चित्र वगळणे असे दुर्दैवी प्रकार आपल्याकडे मुस्लिमांच्या लांगुनचालनासाठी केले जात असतात.


प्रतापगड उत्सव समितीने या विषयावर व्यापक जनजागृती करण्याचे ठरवले आहे. सध्या आपल्या देशात दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांनी थैमान घातले आहे. या परिस्थितीत संपूर्ण देशाला आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी नागरिकामध्ये लढाऊ वृत्ती निर्माण होण्याची गरज आहे. अफजलखानाच्या रुपाने शिलाजी महाराज यांनी महाराष्ट्रावर चाल करुन आलेल्या दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला केला होता. त्यामुळे दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अफजलखान वधाचा हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असे समितीचे म्हणणे आहे.


हा शिवप्रताप दिन केवळ महाराष्ट्रातच साजरा न होता तो संपूर्ण देशभरात साजरा झाला पाहिजे. या घटनेकडे जातीय किंवा धार्मिक दृष्टीकोनातून न पाहता राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. प्रतापगड उत्सव समितीतर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी वाई येथे शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम होणार आहे. या वेळी कर्नल संभाजी पाटील यांना वीरजीवा महाले तर शिवभक्त हरिदास पडळकर यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


२४ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी काही ना काही कार्यक्रम आयोजित केला जावा, असे आवाहनही या समितीने केले आहे.

प्रतापगड उत्सव समितीचे पदाधिकारी असे

विजयाताई भोसले-निमंत्रक, संजय भोसले-अध्यक्ष, मिलिंद एकबोटे- कार्याध्यक्ष, विनायक सणस-उपाध्यक्ष

अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी

मिलिंद एकबोटे-९४२३५७२३८०

अन्य क्रमांक-९८८१७३४२०३/९७६७७५५९९२/९९२२३४१३२२

No comments:

Post a Comment